वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक, वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी देवेंद्र उर्फ बंड्या रामचंद्र आरेकर (५८) हे शनिवारी येथील कॅम्प परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.आरेकर हे गेली अनेक वर्षे नगरपरिषदेच्या वाहनांवर चालक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते कॅम्प-म्हाडा मार्ग येथून महोत्सवाच्या दिशेने जात असताना नगरपरिषद मॉल इमारतीच्या परिसरात त्यांची दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला.
या अपघातात आरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, बहीण, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहन चालक गौरव आरेकर यांचे ते वडील होत. बंड्या आरेकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.१८ जानेवारीपासून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी हे या महोत्सवात गुंतले असतानाच नगरपरिषदेच्या कर्मचाºयाचे आकस्मिक निधन झाल्याने या महोत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे.उसप येथे वृद्धेचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यूदोडामार्ग : तालुक्यातील उसप^-धुरीवाडा येथे बोअरिंग खोदणाऱ्या ट्रॅक्टरने वयोवृद्ध महिलेला पंधरा फूट फरफटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेला गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी नेत असताना तिचे वाटेतच निधन झाले. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया ट्रॅक्टर चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.दोडामार्ग येथून जवळच असलेल्या उसप-धुरीवाडा येथे रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने जाणाºया एका बोअरिंग खोदकाम करणाऱ्या राजस्थान येथील ट्रॅक्टरने मांजर शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या चंद्रावती वासुदेव धुरी (७४) हिला पंधरा फूट फरफफट नेले. या अपघातात ती गंभीर झाली.
तिला दोडामार्ग येथील रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना तिचे वाटेतच निधन झाले. या ट्रॅक्टरला नंबर तसेच कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. अपघाताची पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती.