विक्रांत गाड ‘वॉरियर्स श्री’

By admin | Published: December 24, 2014 09:09 PM2014-12-24T21:09:35+5:302014-12-25T00:22:12+5:30

शरीरसौष्ठव स्पर्धा : बॉडी बिल्डर राकेश सावंत, बेस्ट पोझर जयेश परब

Vikrant Gad 'Warriors Shri' | विक्रांत गाड ‘वॉरियर्स श्री’

विक्रांत गाड ‘वॉरियर्स श्री’

Next

सावंतवाडी : वॉरियर्स ग्रुप, सावंतवाडी आयोजित संदेश पारकर पुरस्कृत शरीर सौष्ठव स्पर्धेत कणकवलीचा विक्रांत गाड हा ‘वॉरियर्स श्री २०१४’ चा मानकरी ठरला. मोस्ट इप्रुव्हड बॉडी बिल्डरचा मान राकेश सावंत याने मिळविला. तसेच बेस्ट पोझर म्हणून जयेश परब याची निवड करण्यात आली.
येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, सुधीर आंजिवडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेटे, डॉ. विठ्ठल गाड, निशांत तोरस्कर, अनुप नाईक, गौरव देशमुख, दीपक सावंत आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात प्रथम सुधीर रमाकांत हळदणकर (सावंतवाडी), द्वितीय भूषण कुडाळकर (कुडाळ), तृतीय अक्षय बोडचे (मालवण), चतुर्थ पॉल बॅनी डिसोजा (सावंतवाडी) व पाचवा क्रमांक गंगाराम नाईक (वेंगुर्ले) याने मिळविला.
५५ ते ६० किलो वजनी गटात प्रसाद कानडे (कणकवली), जयेश परब (वेंगुर्ले), सूरज जाधव (मालवण), अमित घाडीगावकर (कणकवली) व संतोष अनंत केरकर (वेंगुर्ले) यांनी प्रथम पाच क्रमांक मिळविले. ६० ते ६५ किलो वजनी गटात प्रथम अमर राठोड (कणकवली), द्वितीय रमेश सावंत (शिरोडा), तृतीय अमजद शेख (कणकवली), चतुर्थ संजय पार्सेकर (सावंतवाडी) व पाचवा क्रमांक समीर मेस्त्री (कणकवली) यांनी मिळविला. ६५ ते ७० किलो गटात विशाल कसालकर (कणकवली), सहदेव नार्वेकर (शिरोडा), सूरज पवार (मळगाव), विकास परूळेकर (मालवण) व मनोहर कावले (वेंगुर्ले) यांनी प्रथम पाच क्रमांक मिळविले.
खुल्या गटात प्रथम विक्रांत विठ्ठल गाड (कणकवली), द्वितीय संतोष कीर (वेंगुर्ले), तृतीय राकेश सावंत (शिरोडा), चतुर्थ सोहेल शेख (कणकवली) व पाचवा क्रमांक दशरथ कुर्ले (वेंगुर्ले) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेत पंच म्हणून जावेद शेख, किशोर सोन्सूरकर, निशांत तोरसकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वॉरियर्स ग्रुपचे अध्यक्ष विक्रांत हळदणकर, आसिफ शेख, वसीम शेख, नियाज शेख, अक्षय पारकर, सुधीर हळदणकर, पवन बिद्रे, धनंजय परब, सुधीर राऊळ, तन्वीन शेख, बाबूराव सावंत, केदार तानावडे, नीतेश म्हाडगूत या सर्वांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)
मंडळाला शुभेच्छा
यावेळी संदेश पारकर म्हणाले की, युवा पिढीने अशाप्रकारचे उपक्रम राबविणे कौतुकास्पद आहे. आज जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे, तर यापुढे राज्यस्तरीय स्पर्धाही भरविणे युवा पिढीला कठीण नाही, असे सांगून पारकर यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी वॉरियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेत्या विक्रांत गाड याला संदेश पारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आसिफ शेख, विक्रांत हळदणकर, वसीम शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Vikrant Gad 'Warriors Shri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.