शेतक-यांना लाभ केव्हा मिळणार, कर्जमाफी याद्या अपलोड करण्यातच अडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 01:02 PM2017-11-19T13:02:05+5:302017-11-19T13:02:10+5:30

कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतक-यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम सुरू असतानाच

When the farmers get benefits, they will not be able to get loan waiver lists | शेतक-यांना लाभ केव्हा मिळणार, कर्जमाफी याद्या अपलोड करण्यातच अडकल्या

शेतक-यांना लाभ केव्हा मिळणार, कर्जमाफी याद्या अपलोड करण्यातच अडकल्या

Next

सिंधुदुर्गनगरी : कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतक-यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम सुरू असतानाच ‘महा आॅनलाईन’च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (सीएसएमएसएसवाय) या नवीन ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने याद्या ‘अपलोड’ करण्याचे बँकांना निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पुन्हा शेतक-यांच्या याद्या नवीन ‘पोर्टल’ वर अपलोड करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच असल्याने, कर्जमाफीस पात्र शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत गत महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, शासनाच्या ‘महा आयटी’ विभागामार्फत शेतकºयांच्या ‘ग्रीन’ याद्या बँकांना प्राप्त होतील आणि त्यानंतर शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सहकारी संस्था व  बँकांमार्फत पूर्ण करण्यात आले. 
शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू असतानाच कर्जमाफीस पात्र शेतकºयांच्या याद्या ‘महाआॅनलाईन’च्या ‘सीएसएमएसएसवाय’ या ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने ‘अपलोड’ करण्याचे निर्देश शासनाच्या महा-आयटी विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले. त्यानुसार पुन्हा नव्याने नवीन पोर्टलवर कर्जमाफीस पात्र शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले. शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच असल्याने कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार केव्हा? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: When the farmers get benefits, they will not be able to get loan waiver lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.