आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २४: कौशल्य विकास अंतर्गत गेले काही वर्ष सिंधुदुर्ग जिल्हयात जन शिक्षण संस्थानने सातत्याने उत्तम व उल्लेखनिय कार्य केले आहे. एक लाखावर लाभाथीर्ना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन चाळीस हजार लाभार्थींना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जन शिक्षण संस्थानच्या या राष्ट्रीय कार्याबद्धल मन:पूर्वक अभिनंदन करतो असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कुडाळ येथे बोलताना काढले.कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित मानव साधन विकास संस्था, मुंबई संचलित जन शिक्षिण संस्थानच्या रिर्सोस सेंटर इमारतीचे भूमिपूजन व कॉलेज आॅफ नर्सिंग आणाव यांच्या बहुउद्देशिय सभागृहाच्या उद्घाटन समारंभात फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या संमारंभास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उयोंग मंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री दिपक केसरकर, बंदर विकास राज्य मंत्री रविंद्र चव्हाण, सौ. रश्मी ठाकरे, उमा प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वयोगटातील आहे. या तरुण-तरुणींसाठी रोजगाराचे महत्व लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासासाठी विविध योजना कार्यान्वित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना मोठया प्रमाणात रोजगार मिळत आहे. हे संस्थानचे कार्य उल्लेखनिय आहे.उमा प्रभू या सक्षमपणे या संस्थानचा कार्यभार सांभाळत आहेत. असे कौतुकपूर्ण उदगार काढून मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणात या संस्थानच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.प्रारंभी संस्थानचे अध्यक्ष डॉ. शरद सामंत यांनी प्रास्ताविकात जन शिक्षण संस्थानच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी जन शिक्षण संस्थानच्या कायार्चा परिचय करुन देणारी चित्रफित दाखविण्यात आली. शेवटी नकूल पार्सेकर यांनी आभार मानले.समारंभास आमदार वैभव नाईक, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजन तेली, अतुल काळसेकर, काका कुडाळकर तसेच महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जन शिक्षण संस्थानचे कार्य उल्लेखनिय : देवेंद्र फडणवीस
By admin | Published: June 24, 2017 6:10 PM