अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:34 PM2024-11-30T12:34:46+5:302024-11-30T12:35:32+5:30

एका मुलीने तिच्याच वडिलांशी लग्न केलं आहे. एका व्हिडीओमधून हा दावा करण्यात आला आहे.

24 year girl married with her 50 year old father people shocked but she responding shamelessly | अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न

अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न

सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओची तुफान चर्चा रंगते. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून व्हायरल होत आहे. एका मुलीने तिच्याच वडिलांशी लग्न केलं आहे. एका व्हिडीओमधून हा दावा करण्यात आला आहे. मुलीला प्रश्न विचारला जातो की, तुम्ही दोघं कोण आहात? 

मुलगी बिनधास्त उत्तर देत सांगते की, हे माझे वडील आहेत आणि आम्ही लग्न करून आनंदी आहोत हे जगाला दाखवून दिलं आहे. आमच्या नात्याला कोणीही पाठिंबा देत नव्हतं. पण आमचं लग्न झालं आणि आता आम्हाला कुणी पाठिंबा देणं किंवा न देणं याने आम्हाला काही फरक पडत नाही. जेव्हा वडिलांना विचारलं जातं, ही तुमची मुलगी आहे का? तर वडील आणि मुलगी एकत्र म्हणतात की हो, मग यात काय अडचण आहे?

मुलीचे वडील म्हणतात, कुठल्या जमान्यात राहता? कशाला लाज वाटायची? मुलगी स्वत: सांगत आहे की, ती २४ वर्षांची आहे आणि तिचे वडील सांगत आहेत की ते ५० वर्षांचे आहे. दोघांना हा व्हिडीओ बनवण्याचं कारण विचारलं असता, आम्हाला जगाला सांगायचं आहे, असं मुलीचे म्हणणं आहे. "लोक आमच्या पाठीमागे आमच्या नात्याबद्दल बोलतात."

"आम्हाला अशा परिस्थितीत एक व्हिडीओ बनवायचा आहे आणि त्यांना आमच्या नात्याबद्दल सांगायचं आहे. आमचं लग्न हे त्या लोकांना उत्तर आहे जे आमच्याबद्दल वाईट बोलायचे" असं मुलीने सांगितलं. मात्र, ही मुलगी कोण, तिचे वडील कोण, ती कुठली? या सर्व बाबींची माहिती उपलब्ध झालेली नाही. जयसिंग यादव या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. याआधी देखील हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. 
 

Web Title: 24 year girl married with her 50 year old father people shocked but she responding shamelessly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.