Boycott Maldives : अलिकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात केलेल्या आक्षपार्ह टिप्पणीमुळे दोन्ही देशांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सोशल मीडियावरही बायकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात बायकॉट मालदीव ट्रेंड चालू झाला. भारतीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मालदीव ट्रीपची काढलेली तिकिटे रद्द केली. अशाच एका देशप्रेमी व्यक्तीने पंतप्रधानांच्या समर्थनार्थ त्याने मालदीव ट्रीप कॅन्सल केली. या नेटकऱ्याने याची माहिती त्याच्या एक्स अकाउंटवर दिली आहे.
या व्यक्तीने मालदीव ट्रीप कॅन्सल करत त्याच्या पोस्टवर लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सॉरी मालदीव... माझ्याकडे लक्षद्वीप आहे. मी आत्मनिर्भर आहे, असं लक्षवेधी कॅप्शन या यूजरने पोस्टवर दिलं आहे. अतक्षित सिंह नावाच्या व्यक्तीने स्वत ची मालदीव ट्रीप रद्द करत देशासह पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे.
या व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. काहींनी तर त्यांच्या विकेंड प्लॅन लिस्ट डेस्टिनेशमधून मालदीवला वगळल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेटाची भ्रमंती केली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून मालदीवमध्ये मोठा गदारोळ माजला.
येथे पाहा -