प्रत्येकाच्या नशीबात श्रीमंत होणं लिहिलेलं नसतं. परंतु काहींचे नशीब इतकं जोरदार असतं की त्यांच्या हातात खजिनाच लागतो. तुम्ही पाहत असाल तर अलीकडे जुन्या काळातील वस्तू मार्केटमध्ये विकायला आल्यास त्याची किंमत किती असते. त्याचमुळे लोक जुन्या आणि दुर्मिळ वस्तू सांभाळून ठेवतात. त्यानंतर गरज भासल्यास ती लाखो-कोट्यवधीमध्ये विकून टाकतात. काही जणांच्या हाती चुकून असा खजिना लागतो ज्यावर त्यांना विश्वास बसत नाही. असेच काहीसे एका महिलेसोबत घडले. ज्याची चर्चा सोशल मीडियात ट्रेडिंग आहे.
या महिलेने केवळ २ हजार रुपये खर्च करून मार्केटमधून असा खजिना विकत घेतला. ज्याची खरी किंमत नंतर ऐकून तीदेखील हैराण झाली. या महिलेचे नाव फ्लोरा स्टील असं आहे. रिपोर्टनुसार, फ्लोरानं विना काही विचार करता ३५ वर्षापूर्वीचा चांदीचा एक ब्रोच खरेदी केला होता. तेव्हा तिला जाणीव नव्हती की, तो ब्रोच १९ व्या शतकातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण दागिन्याचा एक तुकडा होता. मात्र जेव्हा तिने बीबीसीच्या हिट सीरीज एंटिक्स रोड शो पाहिला तेव्हा तिला ते माहिती पडले. या शोमध्ये दाखवलेले दागिने तिच्याकडे असलेल्या तुकडा एकसारखाच होता. त्यानंतर या महिलेने अशा वस्तू विकत घेणाऱ्यांशी संपर्क साधला.
हा ब्रोच महान विक्टोरियन गोथिक रिवाइवल डिझाईनर आणि वास्तूकार विलियम बर्गेसद्वारे बनवण्यात आला होता. जो साऊथ वेल्समध्ये कार्डिफ कॅसल आणि कोस्टल कोच डिझाईन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे बरेच डिझाईन विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात प्रसिद्धीसाठी ठेवले आहे. फ्लोराने १९८८ मध्ये मिडलँडस प्राचीन वस्तूंच्या एका बाजारात २० पौंड म्हणजे अवघ्या २ हजार रुपयांत खरेदी केले होते. परंतु ही वस्तू लिलावकर्त्यांनी त्यांच्याकडून १५ हजार पौंड म्हणजे जवळपास १५ लाख रुपयात विकत घेतली. याआधी अशाप्रकारचा ब्रोच विक्रीसाठी आला होता. तो ३१ हजार पौंड म्हणजे ३२ लाखांपर्यंत विकला गेला होता. त्याचा लिलाव २०११ मध्ये करण्यात आला होता.