काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीची चर्चा जगभरात झाली. आता तेथील सेंट्रल न्यू साउथ वेल्समधील काही फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. आगीनंतर आता इथे वाळूच्या वादळाने थैमान घातलंय. हे वादळ इतकं भयंकर आहे की, बघूनच थरकाप उडेल.
हा फोटो Jason Davies यांनी काढलेला आहे. यात धुळीचा एक मोठा लोळ दिसत आहे.
अशाप्रकारचं वादळ जास्तीकरून मध्य आशियामध्ये येतं. आणि तेथील फोटोही नेहमीच समोर येत असतात.
या वादळावेळी या परिसरात काहीच दिसत नव्हतं. Dubbo मध्ये हवा फारच वेगवान होती. येथील लोकांनी सांगितले की, वादळामुळे तिथे काहीच दिसत नव्हतं.