पेट्रोलच्या दरांमध्ये रोजच वाढ होऊ लागली आहे. काही शहरांमध्ये तर पेट्रोल 100 रुपये पार गेले आहे. आता हा मुद्दा सोशल मीडियावर खूप गाजू लागला असून लोक यावर मजेशीर मेमेज बनवू लागले आहेत. कॉमेडियन श्याम रंगीला याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिमिक्री करून पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर एक व्हिडीओ बनवला होता. आता पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. (Car owner Want's Petrol on Emi of Bajaj Finserve Card)
कॉमेडियन शाम रंगीलाने राजस्थानमधील एका पेट्रोल पंपावर व्हिडिओ बनवला होता. आपल्या सायकलसह त्याने पेट्रोल पंपावर जाऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. मोदी सरकारवर टीका करतानाचा हा व्हिडिओ असून नेहमीच्या स्टाईलने त्याने विडंबन केले आहे. व्हिडिओच्या शेवटी तो पेट्रोलचे भाव वाढल्याने आता पेट्रोल परवडत नसून आपण सायकलने प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. शाम रंगीलाच्या या व्हिडिओला पेट्रोल पंपमालकाने आक्षेप घेत पोलिसात धाव घेतली आहे.
FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...
मेरे प्यारे देशवासियों, राजस्थान के श्री गंगानगर के जनता का सीना चौडा हो गया है, यहाँ पर पेट्रोल की किंमत 100 रुपये छु गई है. आझाद भारत के इतिहास मे एैसी कोई भी सरकार नही आयी थी, जो पेट्रोल को उसकी असली किमत दिला दे. पेट्रोल को उसका हक हमने दिलवाया है... या शब्दांसह कॉमेडियन आणि मोदींच्या आवाजाची मिमिक्री करणारा कलाकार शाम रंगीला याने पेट्रोल पंपासमोर एक तयार केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्याचं काम रंगीलाने केले होतं. मात्र, शाम रंगीलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...
हे प्रकरण शांत होत नाही तोच, आता एका कारचालकाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. एक कारचालक त्याच्या मित्रांसोबत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर फिलरला बजाज फिनसर्व्हचे ईएमआय कार्ड देऊन पेट्रोलच्या बिलाचा ईएमआय करून दे, खूप गरीबी आली आहे, असे सांगताना दिसत आहे. यानंतर त्याच्यासोबत बसलेले त्याचे मित्र हसतानाचा आवाज येत आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी फिलरच्याही ही गंमत लक्षात येताच तो देखील हसतो. परंतू त्या आधी बिलाचा ईएमआय कसा करायच्या या प्रश्नाने तो देखील अचंबित होतो, हे दिसत आहे.
रंगीलाचा व्हिडीओ....