कोरोना काळात सगळ्यात महत्वाची भूमिका असेल तर ती कोरोना योद्धांची. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रात्रंदिवस आरोग्य सेवेतील कर्मचारी, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी काम करत आहेत. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही कोरोना योद्ध्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एका नर्सचा फोटो व्हायरल होत आहे.
पीपीई किट घालून दिवसभर काम करणं काही सोपं काम नाही. आरोग्य सेवेतील कर्मचारी जवळपास ८ ते ९ तास पीपीई किट घालून काम करतात. सध्या सोशल सोशल मीडियावर पीपीई किट घालून थकलेल्या अवस्थेत बसलेल्या एका नर्सचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो खानपाडा कोविड 19 सेंटरमधील आहे. या फोटोतून फ्रंट लाईन्स वॉरिअर्सचा संघर्ष दिसून येतो. आसामचे आरोग्यमंत्री हिम्मत बिसवा शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
हा फोटो सगळ्यात आधी Ron Bikash Gaurav या सोशल मीडिया युजरने शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन असं लिहिले होते की, सध्या गुवाहाटीचे तापमान जवळपास ३२ ' डिग्री सेल्सियस आहे. कोरोना वॉरिअर्सना पीपीई किट परिधान केल्यानंतर किती समस्यांचा सामना करावा लागत असेल याबाबत आपण विचारही करू शकत नाही. आसामच्या आरोग्यमंत्र्यांनी हा फोटो रिट्वीट करत मला माझ्या टीमवर गर्व आहे असं कॅप्शन दिले आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिमानास्पद अशा कमेंट्स या फोटोला मिळत आहेत.
याआधी सुद्धा सोशल मीडियावर पीपीई काढल्यानंतरचा डॉक्टरांच्या हाताचा फोटो व्हायरल झाला होता. आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी १० तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरांच्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना अववीश शरण यांना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १० तास सतत पीपीई किट घालून काम केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा हातातील ग्लोव्हज काढले तेव्हा हातांची अवस्था अशी झाली होती. हा फोटो पाहून कोरोनाला हरवण्यासाठी झुंज देत असलेल्या आरोग्यसेवेतील कर्मचारी वर्गाची काय स्थिती असेल हे तुमच्या लक्षात येईल.
खुशखबर! कोरोना विषाणूंना नष्ट करणार 'कोरोनाविर'; 'या' औषधानं रोखता येईल विषाणूंची वाढ
CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार