काय सांगता? आता हाय-फाय झाला बाबा का ढाबा; अन् काऊंटर सांभाळताहेत बाबा
By Manali.bagul | Published: December 21, 2020 07:30 PM2020-12-21T19:30:05+5:302020-12-21T19:36:18+5:30
Trending Video in Marathi : या नवीन दुकानाचे भाडे दरमहा 35 हजार रुपये आहे.
इंटरनेटवर कधी, काय व्हायरल होईल हे कोणालाही माहिती नसते आणि यामुळेच बर्याच लोकांचे आयुष्यदेखील बदलते. असंच काहीसे घडले आहे दिल्लीच्या त्या वयोवृद्ध कांता प्रसाद या आजोबांबरोबर, जे आता 'बाबा का धाबा' म्हणून जगात प्रसिद्ध झाले आहे. कांता प्रसाद ज्यांनी एकदा छोट्या दुकानात अन्न शिजवून विकलं आणि लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती हे बाबा अक्षरक्षः रडले. आता त्यांचे दिवस बदलले आहेत. बाबांनी आता एक मोठा हाय-फाई ढाबा उघडला आहे, ज्यामध्ये आता ते स्वतःच काउंटर हाताळतात. या नवीन दुकानाचे भाडे दरमहा 35 हजार रुपये आहे.
बाबांच्या नव्या ढाब्यावर सीसीटीव्ही कॅमेरादेखील आहे, जेणेकरून ते ढाब्यावर ग्राहकांवर आणि त्यांच्या कर्मचार्यांच्या कामावर लक्ष ठेवता येईल. ढाब्यातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या चित्रांचा वापर करण्यात आला आहे. जेव्हा युट्यूबबर गौरव वासनने त्याचा रडण्याचा व्हिडीओ बनविला तेव्हा लोकांना येऊन जेवायला आवाहन केले तेव्हा बाबांचा ढाबा हिट झाला.
लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर
बाबा का ढाबा’ अवघ्या काही महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आले, रातोरात युट्यूबच्या माध्यमातून बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद सुप्रिसद्ध झाले, अचानक मिळालेल्या या प्रसिद्धी आणि पैशामुळे अनेक जण माझ्यावर जळू लागले असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र कधीही यापूर्वी माझं कोणाशी भांडण अथवा तंटा झाला नाही, तरीही गेल्या काही दिवसांपासून बाबांना फोनवरून आणि ढाब्याजवळ येऊन काही जण धमक्या देत आहेत असा आरोप त्यांनी केले होते.
बाबाचा ढाबा जाळण्याची धमकी मिळत असून या प्रकाराबाबत बाबाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ज्यावर पोलिसांनी तक्रारीच्या आधारावरून तपास सुरु केला होता. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांनंतर बाबाचे वकील प्रेम जोशी पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. वकील प्रेम जोशींनी याबाबत मालवीय नगरमध्ये तक्रार नोंदवली होती.