शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

काय सांगता? आता हाय-फाय झाला बाबा का ढाबा; अन् काऊंटर सांभाळताहेत बाबा

By manali.bagul | Published: December 21, 2020 7:30 PM

Trending Video in Marathi : या नवीन दुकानाचे भाडे दरमहा  35 हजार रुपये आहे.

इंटरनेटवर कधी, काय व्हायरल होईल हे कोणालाही माहिती नसते आणि यामुळेच बर्‍याच लोकांचे आयुष्यदेखील बदलते. असंच काहीसे घडले आहे दिल्लीच्या त्या वयोवृद्ध कांता प्रसाद या आजोबांबरोबर, जे आता 'बाबा का धाबा' म्हणून जगात प्रसिद्ध झाले आहे. कांता प्रसाद ज्यांनी एकदा छोट्या दुकानात अन्न शिजवून विकलं आणि लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती हे बाबा अक्षरक्षः रडले. आता त्यांचे दिवस बदलले आहेत. बाबांनी आता एक मोठा हाय-फाई ढाबा उघडला आहे, ज्यामध्ये आता ते स्वतःच काउंटर हाताळतात. या नवीन दुकानाचे भाडे दरमहा  35 हजार रुपये आहे.

बाबांच्या नव्या ढाब्यावर सीसीटीव्ही कॅमेरादेखील आहे, जेणेकरून ते ढाब्यावर ग्राहकांवर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या कामावर लक्ष ठेवता येईल. ढाब्यातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या चित्रांचा वापर करण्यात आला आहे. जेव्हा युट्यूबबर गौरव वासनने त्याचा रडण्याचा व्हिडीओ बनविला तेव्हा लोकांना येऊन जेवायला आवाहन केले तेव्हा बाबांचा ढाबा हिट झाला.

लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर

बाबा का ढाबा’ अवघ्या काही महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आले, रातोरात युट्यूबच्या माध्यमातून बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद सुप्रिसद्ध झाले, अचानक मिळालेल्या या प्रसिद्धी आणि पैशामुळे अनेक जण माझ्यावर जळू लागले असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र कधीही यापूर्वी माझं कोणाशी भांडण अथवा तंटा झाला नाही, तरीही गेल्या काही दिवसांपासून बाबांना फोनवरून आणि ढाब्याजवळ येऊन काही जण धमक्या देत आहेत असा आरोप त्यांनी केले होते.

हृदयद्रावक! जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती ती; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

बाबाचा ढाबा जाळण्याची धमकी मिळत असून या प्रकाराबाबत बाबाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ज्यावर पोलिसांनी तक्रारीच्या आधारावरून तपास सुरु केला होता. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांनंतर बाबाचे वकील प्रेम जोशी पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. वकील प्रेम जोशींनी याबाबत मालवीय नगरमध्ये तक्रार नोंदवली होती.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली