अजबच! रोज तब्बल ५०० डासांना आपलं रक्त पिऊ देते ही व्यक्ती, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:37 AM2024-06-11T11:37:36+5:302024-06-11T11:37:53+5:30

Mosquito Man Viral Video: याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, कसा तो डासांजवळ हात नेतो आणि त्यांना आपलं रक्त पिऊ देतो.

Biologist feeds his blood daily to 500 mosquitoes know the reason | अजबच! रोज तब्बल ५०० डासांना आपलं रक्त पिऊ देते ही व्यक्ती, कारण....

अजबच! रोज तब्बल ५०० डासांना आपलं रक्त पिऊ देते ही व्यक्ती, कारण....

Mosquito Man Viral Video: सामान्यपणे डास आपल्या आजूबाजूला तरी आले तरी लगेच त्यांना मारलं जातं किंवा हाकललं जातं. हाता-पायावर बसले जरी तरी त्यांना लगेच दूर केलं जातं. पण एक व्यक्ती अशी आहे जी एका रिसर्चसाठी रोज ५०० डासांना आपलं रक्त पिऊ देतो. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, कसा तो डासांजवळ हात नेतो आणि त्यांना आपलं रक्त पिऊ देतो.

व्हिडीओत तुम्हाला एक व्यक्ती दिसतेय ज्याला 'मॉस्किटो मॅन' म्हटलं जातं. त्याचं आहे पॅरेन रॉस. तो दररोज ५०० डासांना आपलं रक्त पिऊ घालतो. पॅरेनने सांगितलं की, तो असं रोज करतो, जेणेकरून डासांची लक्षण त्याला जाणून घेता यावी. तो या रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, डास किती वेळ जिवंत राहू शकतात आणि त्यांच्या आतील बॅक्टेरिया किती अॅक्टिव असतात.

@60secdocs नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात एक व्यक्ती एका जाळीदार पिंजऱ्यात हात टाकतो आणि त्यातील डास त्याच्या हातावर बसून रक्त पितात. १० सेकंदानी तो पिंजऱ्यातून हात बाहेर काढतो आणि पाण्याने धुतो. तेव्हा डासांचे दंश स्पष्टपणे हातावर दिसतात. व्हिडीओत पॅरेन म्हणत आहे की, या कामासाठी त्याला एका वॉलेंटिअरची गरज होती. पण आता मीच रोज त्यांना माझं रक्त देतो.

हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं की, याच्याकडून सीरिअल किलर वाइब येत आहे. दुसऱ्याने लिहिलं की, यापेक्षाही वेगळे काही मार्ग असू शकतात डासांना अन्न पुरवण्याचे.

Web Title: Biologist feeds his blood daily to 500 mosquitoes know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.