उघड्यावर बाळाला दूध पाजण्यापासून रोखलं; महिलेनं दिलं चोख उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 02:17 PM2018-08-10T14:17:55+5:302018-08-10T14:18:48+5:30

काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. पण अद्यापही आपण स्तनपानाच्या गोष्टीकडे उघडपणे पाहू शकत नाही.

Breastfeeding mom cover her face picture goes viral | उघड्यावर बाळाला दूध पाजण्यापासून रोखलं; महिलेनं दिलं चोख उत्तर!

उघड्यावर बाळाला दूध पाजण्यापासून रोखलं; महिलेनं दिलं चोख उत्तर!

googlenewsNext

काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. पण अद्यापही आपण स्तनपानाच्या गोष्टीकडे उघडपणे पाहू शकत नाही. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार एका आईसोबत रेस्टॉरंटमध्ये उघड झाला आहे. बाळाला दूध पाजणं हे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अशी महत्त्वपूर्ण गोष्टच आईला एखाद्या कोपऱ्यात किंवा लपूनछपून करावी लागते. 

मेक्सिकोमधील एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या 4 महिन्यांच्या बाळासह गेली होती. तिथं असतानाच बाळाला भूक लागल्यामुळे ते रडू लागलं. त्यामुळे त्या महिलेनं तिथंच बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केली. अशातच तिथं असलेल्या सर्व लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. त्यातील एका पुरूषाने त्या महिलेला आपलं शरीर झाकून घेण्यास सांगितलं. त्या महिलेनं पुरूषाला चोख उत्तर देत, आपल्या शरीराऐवजी स्वतःचा चेहरा झाकून घेतला.

महिलेनं दिलेल्या या चोख उत्तराची सोशल मीडियावर खूप स्तुती करण्यात येत आहे. महिलेचा स्तनपान करतानाचा फोटो पोस्टसह फेसबुकवरून कॅरल लॉकवुड याने शेअर केला आहे. या व्यक्तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या एका मित्राची सून आपल्या बाळाला दूध पाजतं होती. तेवढ्यात एका पुरूषाने तिला तिचं शरीर झाकून घेण्याचा सल्ला दिला. मी तिला कधी भेटलो नाही पण तिनं दिलेल्या उत्तरानं फार खूश आहे.' तसेच या व्यक्तीनं आपली पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचं आव्हान केलं आहे. ज्यामुळे स्तनपानाबाबत असलेला लोकांचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल. 

खरचं स्तनपानाबाबतीत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. बऱ्याच जणांना उघड्यावर बाळाला दूध पाजणं म्हणजे शरीर प्रदर्शन वाटतं. त्यामुळे स्तनपानाबाबत समाजात पसरलेले गैरसमज बदलण्याची गरज आहे. अशा उदाहरांवरून स्तनपानाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षा करूयात. 

Web Title: Breastfeeding mom cover her face picture goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.