Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

By Manali.bagul | Published: February 21, 2021 12:09 PM2021-02-21T12:09:02+5:302021-02-21T12:21:14+5:30

Petrol price hike Video : सोशल मीडियावर पेट्रोलच्या भाववाढीशी (Petrol price hike) संबंधीत असलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

Bride and groom received petrol onion and gas cylinders in the gift see viral video | Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

googlenewsNext

इंधनाच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत.  सलग ११ व्या दिवळी पेट्रोलच्या (Petrol)  किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून मीम्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी जुगाड करत आपल्या  गाडीला सायकलची चाकं जोडल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर पेट्रोलच्या भाववाढीशी (Petrol price hike) संबंधीत असलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

तामिळनाडूच्या  (Tamilnadu)  एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी अनोखं  गिफ्ट दिलं आहे. कोणी पेट्रोलचा (Petrol)कॅन, कोणी एक गॅस सिलेंडर (Gas Cylinder) तर कोणी कांदे गिफ्ट म्हणून दिले आहेत. लग्नाच्यावेळी एक अनोखं गिफ्टं मिळवण्याच्या एक कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये, आपण जोडप्यासह स्टेजवर पाहुणे उभे असलेले पाहू शकता.

पाहुण्यांच्या हातात पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि कांदे दिसतात गिफ्ट घेऊन सर्वजण एकत्र येऊन स्टेजवर उभे आहेत. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आनंदी दिसत आहे. आपण पाहू शकता की वधू हसत आहे आणि तिचे हसणे थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''तामिळनाडूमध्ये जोडप्यास लग्नाच्या भेटवस्तूंमध्ये पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि कांदे मिळाले'. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ हजाराहून अधिक वेळा पाहिलेला आहे. यासोबतच लोक त्यावर गमतीदार कमेंट्सही देत ​​आहेत. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

Web Title: Bride and groom received petrol onion and gas cylinders in the gift see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.