Bro Sis Love Emotional Video: वेड्या भावाची वेडी ही माया... रडणाऱ्या मोठ्या बहिणीची चिमुरड्याने काढली समजूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 12:27 PM2022-12-04T12:27:51+5:302022-12-04T12:28:32+5:30
लहान भाऊ बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसत तिला समजवताना दिसला...
Brother Sister Love Emotional Video: इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी खेळाची अनोखी क्लिप चर्चेत येते. कधी हसायला लावणारा व्हिडीओ पोट धरायला लावतो तर कधी खळबळजनक व्हिडीओ धक्का देऊन जातो. पण तरीही बरेचसे व्हिडीओ अतिशय संवेदनशील आणि चांगले असतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका लहान भाऊ आपल्या मोठ्या मोठ्या बहिणीची समजून काढताना दिसतोय. खरं तर भाऊ केवळ सात-आठ वर्षांचा आहे, पण तो एखाद्या मोठ्या माणसासारखा आपल्या ताईची समजून काढताना आणि तिचे डोळे पुसताना दिसतोय. (Trending on Social Media)
हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सने शेअर केला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचे छान वर्णन करणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये एक सात वर्षांचा मुलगा आपल्या रडणाऱ्या मोठ्या बहिणीला समजवताना दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा आपल्या बहिणीच्या शेजारी उभा आहे आणि बहीण खुर्चीवर बसली आहे. ती उदास आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. आधी तो मुलगा आपल्या बहिणीची नीट विचारपूस करतो, मग तिच्या डोळ्यातले अश्रू पुसतो आणि बहिणीला एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे समजवायचा प्रयत्न करतो. ही छोटी व्हिडिओ क्लिप दोन भावंडांमधील अपार प्रेम दर्शवते.
व्हिडीओच्या माहितीनुसार, भाऊ अवघ्या ७ वर्षांचा तर बहीण विशीतली आहे. ती कशावरून तरी रडत असते. त्यावेळी चिमुरडा भाऊ आपल्या ताईला समजवतो आणि शांत करतो. हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. बऱ्याच वेळा हा व्हिडीओ वेगवेगळ्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडीओला अनेकांनी लाइक केले आहे. तसेच सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक तो शेअर करत आहेत.