VIDEO : चोराने दाखवला बंदुकीचा धाक तर 'त्याने' केली जोरदार धुलाई, ओरडून ओरडून मागत होता माफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:08 PM2021-04-22T16:08:37+5:302021-04-22T16:08:48+5:30

दोन चोर हातात बंदुक घेऊन त्याच्याकडे आले. त्यानंतर जे झालं त्याचा कुणालाही अंदाज नव्हता. त्या व्यक्तीने दोनपैकी एका चोराची धुलाई सुरू केली.

California robber getting body slammed by the person he was trying to rob see viral video | VIDEO : चोराने दाखवला बंदुकीचा धाक तर 'त्याने' केली जोरदार धुलाई, ओरडून ओरडून मागत होता माफी!

VIDEO : चोराने दाखवला बंदुकीचा धाक तर 'त्याने' केली जोरदार धुलाई, ओरडून ओरडून मागत होता माफी!

Next

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यात दाखवण्यात आले आहे की, एका व्यक्तीला लुटण्यासाठी आलेल्या दोन चोरांची त्या व्यक्तीने चांगलीच धुलाई केली. कॅलिफोर्नियाच्या सॅन लिएंड्रोमध्ये राहणारी एक व्यक्ती कारजवळ उभी होती. जसं त्याने कारचं लॉक उघडलं. दोन चोर हातात बंदुक घेऊन त्याच्याकडे आले. त्यानंतर जे झालं त्याचा कुणालाही अंदाज नव्हता. त्या व्यक्तीने दोनपैकी एका चोराची धुलाई सुरू केली. तर दुसऱ्याने पळ काढला. 

त्या व्यक्तीने त्याच्याकडे बंदुक रोखून धरलेल्या चोराला उचलून खाली फेकलं. तर तो चोर जोरजोरात ओरडून माफी मागू लागला होता. सोडून देण्याची विनंती करू लागला होता. तर काही अंतरावर उभा असलेला चोरही त्याला सोडून देण्याची भीक मागत होता.

अखेर त्या व्यक्तीने चोराला सोडलं आणि जाऊ दिलं.  @davenewworld नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'कॅलिफोर्नियामध्ये सशस्त्र चोर जेव्हा प्लॅनिंगनुसार होत नाही'. त्या व्यक्तीने चोरासोबत जे केलं ते पाहून लोक प्रभावित झाले आहेत.

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक त्या व्यक्तीचं भरभरून कौतुक करत आहेत. एकाने लिहिले की, 'शानदार'. दुसऱ्याने कमेंट केली की, 'शानदार पद्धतीने घटना रोखली गेली'. 
 

Web Title: California robber getting body slammed by the person he was trying to rob see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.