शोधाशोध! 'या' फोटोत लपलेला पक्षी शोधून शोधून लोक थकलेत, बघा तुम्हाला तरी दिसतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 02:47 PM2021-02-26T14:47:55+5:302021-02-26T14:51:19+5:30
Social Viral : जर तुमचीही नजर चांगली आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही यात घुबड शोधू शकता.
सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन किंवा संभ्रमित करणारे फोटो व्हायरल होत असतात. जेव्हा एखाद्या फोटोमध्ये काही शोधण्याचा मुद्दा येतो तेव्हा लोक पूर्णपणे अॅक्टिव होतात. असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केला आहे. यात एक घुबड लपलेलं आहे. पण तो क्वचितच लोकांना दिसतोय. जर तुमचीही नजर चांगली आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही यात घुबड शोधू शकता.
Spot the Bird?#IndiAves@Avibase
— Dharamveer Meena, IFS (@dharamifs_HP) February 25, 2021
To the owl kings: @manishariprasad @contentbirder pic.twitter.com/DmANEJ1iaM
हा फोटो आयएफएस अधिकारी @dharmifs_HP यांनी शेअर केलाय. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिलंय की, पक्षी शोधा. आतापर्यंत या फोटोला १४६ पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. आणि अनेक लोक या पक्षी शोधत आहेत.
— Dilip Kumar (@dilipkkarn) February 25, 2021
— Mayuri (@Friend4u_Mayuri) February 25, 2021
झाडाचा आणि घुबडाचा रंग एकच असल्याने तो सहजपणे दिसून येत नाही. पण काही लोकांनी त्याला पटकन शोधलं आहे तर काही अजूनही शोधत आहेत.