कॅन्सरशी लढणाऱ्या आईचं भावूक ट्विट, युजर्स हादरले; मुलाला म्हणाली “मी हरले अन् आता मरणार आहे...”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:54 PM2021-05-13T15:54:13+5:302021-05-13T15:54:56+5:30

डॉ. चौधरी यांना जून २०२० मध्ये डिम्बग्रंथिचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते आणि ती आता कर्करोगाशी लढत सोशल मीडियावर लोकांशी हा प्रवास शेअर करत आहे.

Cancer patient woman reveals how son reacted to her confession that she dying tweet goes viral | कॅन्सरशी लढणाऱ्या आईचं भावूक ट्विट, युजर्स हादरले; मुलाला म्हणाली “मी हरले अन् आता मरणार आहे...”

कॅन्सरशी लढणाऱ्या आईचं भावूक ट्विट, युजर्स हादरले; मुलाला म्हणाली “मी हरले अन् आता मरणार आहे...”

googlenewsNext

नवी दिल्ली – संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीशी मुकाबला करत आहे. सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरत आहे. यातच कॅनडातील एका न्यूरो सायंटिस्ट डॉ. नादिया चौधरीने आत्मनियंत्रण आणि इच्छाशक्तीची परिभाषाच बदलली आहे. सध्या त्यांनी लिहिलंले एक ट्विट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. डॉ. चौधरी यांना जून २०२० मध्ये कर्करोग(Advanced Ovarian Cancer) झाल्याचं समजलं. तेव्हापासून नादिया चौधरी सोशल मीडियात कॅन्सरशी लढा देणारा प्रवास लोकांसाठी शेअर करत आहे.

बुधवारी डॉ. नादिया चौधरी यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की, मी कॅन्सरशी लढाई हरणार आहे. मी कॅन्सरमुळे मरणार आहे असं मी माझ्या मुलाला सांगणार आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा मी त्याला हे सगळं सांगणार आहे. माझे सर्व अश्रू आता वाहू द्या कारण मला दुपारी त्याला हे सांगताना बळ मिळेल. मी आता त्याला आराम देऊ शकते असं सांगत त्यांनी मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

डॉ. नादिया चौधरी यांची ही पोस्ट वाचून अनेकांचं काळीज हललं. सर्वजण नादियासाठी प्रार्थना करत आहेत. एका यृजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, नादिया तुमच्यासाठी खूप सारं प्रेम, जगातील सर्व आईं तुम्हाला आमच्यातील थोडी का होईना हिंमत मिळो अशीच इच्छा आहे.

तर दुसऱ्या फोलोअर्सने लिहिलंय की, हे ज्या क्षणाचं तुम्ही वर्णन केले त्या शब्दांनी मला स्पर्श केला. या धावपळीच्या जीवनात विराम मिळाला आहे अशाप्रकारे त्यांच्या पोस्टवर कमेंट मिळत आहेत.

एका फोलोअप ट्विटमध्ये डॉ. चौधरी यांनी पुन्हा लिहिलं की, आमचं मन सुन्न झालं आहे. आम्ही खूप रडलो आणि उपचार सुरू होतील. माझा मुलगा शूर आहे. तो उज्ज्वल आहे. सर्वकाही ठीक होईल आणि मी जिथे कुठे असेल तिथून त्याला पुढे जाताना पाहेन. आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वात कठीण दिवस आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आभार असं त्या म्हणाल्या. अनेक युजर्सने हे दु:खं सहन करण्याची शक्ती मागितली आहे.

Web Title: Cancer patient woman reveals how son reacted to her confession that she dying tweet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.