VIDEO : उशीखाली लपून बसला होता विषारी कोब्रा, फणा काढत निघाला बाहेर आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:38 PM2024-12-11T14:38:19+5:302024-12-11T14:39:13+5:30

Cobra Found Under Pillow: एका व्यक्तीच्या उशीखाली विषारी केप कोब्रा आढळून आला. अशात सर्पमित्राला बोलवून सापाला सुरक्षित पकडण्यात आलं.

cape cobra found under pillow in South African video goes viral | VIDEO : उशीखाली लपून बसला होता विषारी कोब्रा, फणा काढत निघाला बाहेर आणि...

VIDEO : उशीखाली लपून बसला होता विषारी कोब्रा, फणा काढत निघाला बाहेर आणि...

Venomous Cape Cobra Found Under Pillow: जरा विचार करा की, तुम्ही झोपण्याच्या तयारीत आहात आणि अचानक तुमच्या उशीमधून जगातील सगळ्यात विषारी साप फणा काढून बाहेर निघाला. नक्कीच तुमची झोप उडले आणि तुम्ही धावत घराबाहेर जाल. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेलनबॉशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या उशीखाली विषारी केप कोब्रा आढळून आला. अशात सर्पमित्राला बोलवून सापाला सुरक्षित पकडण्यात आलं.

सापाला पकडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात एमिल रॉसू काळजीपूर्वक साप उशीखालून काढताना बघता येतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

स्टेलनबॉश स्नेक रिमूवल्सने व्हिडिओच्या कॅप्शनला केप कोब्रा सापाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय की, 'या सापांचा रंग काळा, हलका भुरका, पिवळा असू शकतो. त्याच्यावर चट्टे असतात. तसेच मानेजवळ एक गर्द रंगाची पट्टी असते. केप कोब्रा सापाला मोल साप आणि ब्लॅक स्पिटिंग कोब्रा सुद्धा म्हणतात. हे साप खूप आक्रामक आणि विषारी असतात. हे साप दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात घातक साप मानले जातात. 

Web Title: cape cobra found under pillow in South African video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.