सोशल मीडियाने अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. अनेकदा मनातलं सांगण्यासाठी काहीजण सोशल मीडियाचा वापर करत असतात. सोशल मीडियावर आपली व्यथा मांडून लाईव्ह आत्महत्या केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मानसिक दडपणाखाली काहीजण टोकाचं पाऊल घेत असतात. अशावेळी लाईव्ह स्ट्रिमिंग करून इतरांच्या उपस्थितीत जीव घेतल्याचं ऐकलं असेल. चीनमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
चीनची सोशल मीडियातील प्रसिद्ध चेहरा लुओ शाओ माओ जी(Luo Xiao Mao Zi) हिनं किटकनाशक औषध प्यायल्याने तिचा मृत्यू झाला आहे. माओ जीने लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी पेस्टिसाइड प्यायलं होतं. लाईव्हवेळी त्यांच्या फोलोअर्सने माओ जी हिला पेस्टिसाइड पिण्यासाठी उकसवलं होतं. त्यानंतप माओ जीनं हे पेस्टिसाइड प्यायलं त्यानंतर जे घडलं त्यांना खळबळ माजली.
पेस्टिसाइड प्यायल्यानंतर २५ वर्षीय माओ हिची तब्येत ढासळली. तिने स्वत: रुग्णवाहिकेला फोन करून घरी बोलावलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर माओने तिच्या अखेरच्या व्हिडीओत सांगितलं होतं की, कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. मी खूप मानसिक तणावाखाली जगत आहे. तेव्हा Douyin वर माओचे ६ लाख ७० हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स होते.
माओ तिच्या अखेरच्या व्हिडीओत पेस्टिसाइड पिताना दिसत आहे. ती म्हणाली की, मी कुठल्याही उत्पादनाला विकण्यासाठी हा व्हिडीओ बनवत नाही. त्यानंतर लाईव्ह स्ट्रिमिंगवेळी तिने पेस्टिसाइड प्यायलं. डेली स्टारच्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबरला ही दुर्घटना माओसोबत घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. माओच्या एका मित्राने सांगितले की, ती गेल्या काही दिवसापासून बॉयफ्रेंडसोबत झालेल्या भांडणामुळे चिंतेत होती. तिचा हेतू पेस्टिसाइड पिऊन जीव देण्याचा नव्हता. ती केवळ बॉयफ्रेंडचं लक्ष वेधू इच्छित होती.
जेव्हा माओनं पेस्टिसाइड प्यायलं होतं तेव्हा हजारो लोक तिला लाईव्ह पाहत होते. चीनी मीडियानुसार, लाईव्हच्या दरम्यान अनेक फॉलोअर्सने माओला पेस्टिसाइड लवकरच पिण्यासाठी उकसवलं होतं. त्यानंतर ही दुर्घटना घडली. ज्यात माओचा मृत्यू झाला.