एकाचवेळी १० बिअर प्यायला अन् १८ तास लघवी रोखून धरली; त्यानंतर ‘जे’ घडलं ते ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:08 PM2020-06-22T12:08:49+5:302020-06-22T12:13:36+5:30
चीनमधील धक्कादायक घटना समोर आली, डॉक्टरांच्या यशस्वी उपचाराने वाचले प्राण
नवी दिल्ली – जर कोणी बिअर पिण्याचे शौकीन असाल तर त्यांना याची माहिती असेल की, बिअर पिल्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते. तुम्ही जितकी जास्त बिअर पिणार तितक्याच जास्त वेळ लघवीला जावं लागण्याची शक्यता असते. कारण लघवी थांबवून धरणे आपल्या शरीरारासाठी घातक असते, अशीच एक हैराण करणारी चीनमधून समोर आली आहे.
माहितीनुसार एका चीनी व्यक्तीने एक-एक करुन १० बिअर पिऊन टाकल्या आणि जवळपास १८ तास त्याने लघवी रोखून धरली. त्याचा परिणाम असा झाला की, त्या व्यक्तीच्या मूत्राशयाची पिशवी शरीरात फुटली. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. मूत्राशयाची पिशवी फाटल्याने असह्य वेदना होऊ लागल्या. या पीडित व्यक्तीची ओळख हू नावाने झाले आहे. या व्यक्तीला चीनच्या पूर्व प्रांतात झेजियांगमध्ये झूजी पीपुल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
एकामागोमाग एक अशा तब्बल १० बिअर पिल्यानंतर या व्यक्तीने १८ तास लघवी रोखून धरली. त्यामुळे शरीरातच मूत्राशयाच्या पिशवी फाटली. यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये या पीडित व्यक्तीचं स्कॅन करण्यात आलं. ज्यात या पीडिताची लघवी रोखून धरल्याने त्याच्या शरीरातील तीन अवयवांवर दबाव वाढला आणि मूत्राशय फाटलं. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
हॉस्पिटलमधील डॉक्टरांना या व्यक्तीवर यशस्वीरित्या ऑपरेशन करण्यात यश आले, शरीरातील मूत्राशयाच्या पिशवीवर उपचार केल्याने सध्या या रुग्णाची तब्येत स्थिर आहे. ही अतिशय दुर्मिळ घटना आहे, जेव्हा कोणता व्यक्ती आपल्या लघवीला रोखून धरण्याचा अथवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अशाप्रकारे घडते. मानवी मूत्राशय द्रवपदार्थाच्या आवरण लवचिक आहे आणि त्यात ३५० ते ५०० मिलीलीटरची मर्यादित क्षमता असू शकते असं डॉक्टरांनी सांगितले.