कोरोनाच्या वाढत्या प्रसारात संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळण्याचे वारंवार आवाहन केलं जात आहे. नियम मोडणाऱ्याला शिक्षासुद्धा केली जात आहे. अशात कोरोनाचे नियम न पाळलेल्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेनं कोरोनाचे नियम तोडल्यानंतर तिला दंड आकारण्याऐवजी पोलिसांनी तिला किस करून सोडून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावरच्या सीसीटिव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असून सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
नक्की कसा घडला हा प्रकार
एका वृत्तवाहिनीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरूवातीला या महिलेची माहिती पोलिस कर्मचारी लिहीताना दिसून येत आहे. याचदरम्यान तो पोलिस महिलेच्या जवळ येतो आणि काही सेकंदातच किस करतो. या पोलिसाचं नाव समोर आलेलं नसून पेरूची राजधानी लीमाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी अधिक तपास सुरू केला आहे. Petrol diesel price hike Video : आता हेच बाकी होतं! भाववाढ ऐकताच पेट्रोल भरताना पठ्ठ्यानं जे केलं ते पाहून पोट धरून हसाल
नियमांचे उल्लंघन
मिराफ्लोरेस जिल्ह्यातील सुरक्षा अधिकारी Ibero Rodriguez यांनी सांगितले की, ही घटना समोर आल्यानंतर सदर दोषी पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस मास्क काढून त्या महिलेला किस करत आहे. Flying dosa Video : लय भारी! मुंबई मॅनच्या 'Flying Dosa’ टेक्निकनं जगाला लावलं वेडं; पाहा जबरदस्त व्हिडीओ