सिंहाची शिकार करून किस करत होतं कपल; नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 03:32 PM2019-07-17T15:32:42+5:302019-07-17T15:39:46+5:30

सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत असून हे फोटो पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एवढचं नाही तर तुम्हाला प्रचंड रागही येईल.

Couple kiss in photo with lion moments after shooting it dead | सिंहाची शिकार करून किस करत होतं कपल; नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर 

सिंहाची शिकार करून किस करत होतं कपल; नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर 

Next

सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत असून हे फोटो पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एवढचं नाही तर तुम्हाला प्रचंड रागही येईल. तुम्ही म्हणाल असा कोणता फोटो व्हायरल होत आहे? खरं तर एका जोडप्याचा किस करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर हे जोडपं ज्या ठिकाणी किस करत आहे, तिथे एक शिकारीमध्ये मारला गेलेला सिंह आहे. 


'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाच्या ट्रॉफी हंटिंग कपल डॅरन आणि कॅरोलिन कार्टर साउथ आफ्रिकेमध्ये 'लेगेलेला सफारी टूर'साठी गेले होते. तेथूनच त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. 


या दोघांचा हा फोटो लेगेलेला सफारीने फेसबुकवर पोस्ट केलेला आहे. परंतु, नेटकऱ्यांनी या फोटोमुळे सर्वांनाच फैलावर घेतलं. त्यानंतर हा फोटो फेसबुकवरून हटवण्यात आला. Yahoo News ने दिलेल्या वृत्तानुसार, फोट पोस्ट करताना कॅप्शनमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, उन्हाळ्यामध्ये एक भारी काम, फार उत्तम, एका राक्षसाच्या रूपामध्ये सिंह'


सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून यूजर्सनी ट्रॉफी हंटिंगला बॅन करण्याची मागणी केली आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, शिकारीमध्ये मारला गेलेल्या सिंहाबाबत डॅरन कार्टर विचारले त्यावेळी त्याने सांगितले की, 'मी याबाबत काहीही कमेंट करणार नाही. कारण हे फार पॉलीटिकल आहे.'

दरम्यान, लेगेलेला सफारीमध्ये टूर दरम्यान टूरिस्ट शिकारही करतात. तिथे जिराफच्या शिकारीसाठी जवळपास 2 लाख रूपये घेतले जातात. एवडचं नाही तर वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळे दर आकरण्यात येतात. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, असं सांगितलं जात आहे की, सिंहाची शिकार करण्यासाठी त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आलं होतं. 

Web Title: Couple kiss in photo with lion moments after shooting it dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.