बाबो! पंख्यापासून लँपपर्यंत...काहीच सोडलं नाही; कपलने हॉटेलमधून चोरी केलं सामान अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:47 AM2023-08-28T10:47:39+5:302023-08-28T10:48:34+5:30
कपलने हॉटेलमध्ये एक रूम बूक केली होती. याच दरम्यान त्यांनी रुममधलं सर्वच सामान चोरी केलं आहे.
एका कपलने असं कृत्य केलं आहे, ज्याबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. या कपलने हॉटेलमध्ये एक रूम बूक केली होती. याच दरम्यान त्यांनी रुममधलं सर्वच सामान चोरी केलं आहे. ब्रिटनच्या वेल्समध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉल्फिन हॉटेलच्या मालकाने आरोप केला आहे की, या कपलने 200 पाउंड म्हणजे जवळपास 20 हजार रुपये किमतीचा माल चोरला आहे.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये चहाची किटली, इलेक्ट्रिक पंखे, टॉवेल, लँप, चहा-कॉफीचा कंटेनरसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. हॉटेलच्या मालकाचे म्हणणे आहे की, जेव्हा हे कपल चेक-इन करण्यासाठी आले तेव्हा त्यांना ते खूप मैत्रीपूर्ण वाटलं. त्यांच्याकडे खूप कमी सामान होतं. ही गोष्टही थोडी विचित्र वाटली. पण हे लोक असं काही करतील असं वाटलं नव्हतं. चोरीमुळे हॉटेलच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
परिणामी आता सर्व वस्तू बदलल्याशिवाय खोली भाड्याने देता येणार नाही. किमान 200 पाउंडचं नुकसान झालं आहे. ते म्हणतात की, कोरोना व्हायरसमुळे आधीच व्यवसायाला मोठा फटका बसला होता आणि अशा घटना केवळ समस्या वाढवण्याचे काम करत आहेत. या कपलशी त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर हॉटेल मालकाला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मिररच्या रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी बँक कार्डचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलीस 43 वर्षीय मार्टिन रेंडेलची चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कपलने हॉटेलमधून सामानाने भरलेल्या मोठ्या पिशव्या घेऊन कारने प्रवास केला आहेत. हे लोक हॉटेलचे सामान बॅगेत घेऊन जात असल्याचे दिसते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.