एका व्यक्तीने त्याच्या बाळाचा चेहरा टी-शर्टवर प्रिंट केला होता. हे टी-शर्ट तो नेहमी घालायचा. पण एक दिवस पत्नी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवत होती, अशात या व्यक्तीचं लक्ष वॉशिंग मशीनवर गेलं आणि त्याला दिसलं की, वॉशिंग मशीनमध्ये बाळ आहे. झालं त्याचा जीव टांगणीला लागला. पण जेव्हा त्याला कळालं की, मशीनमध्ये बाळ नाही टी-शर्ट आहे तेव्हा त्याने हा फोटो imgur वर शेअर केला. तोही सूचना देत.
Please, if you are ever washing your favorite shirt with a picture of your child on it, just put a warning note on the washer or something..
मीडिया रिपोर्ट्नुसार, हा फोटो Imgur यूजर ARussianAndHisBike ने शेअर केला. त्याने लिहिलं की, 'जर तुम्ही सुद्धा तुमची आवडती टी-शर्ट धुवत असाल खासकरून तुमच्या बाळाचा चेहरा असलेलं टी-शर्ट तर एक सूचना नक्की करा'.
पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी हा फोटो पाहिला तेही हैराण झालेत. ही बातमी लिहून होईपर्यंत या फोटोला लाखो लाइक्स मिळाले आहेत. तर लोक यावर कमेंटही करत आहेत. एकाने लिहिले की, अशात तर एखाद्याला हार्ट अटॅकही येऊ शकतो.