त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:40 PM2020-07-20T18:40:14+5:302020-07-20T18:45:48+5:30

गोरगरीबांसाठी अन्नादाता तर अनेकांसाठी खाकी वर्दीतील कर्मचारी देवदूत ठरले. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.

Delhi police constable was trying to help a auto driver after heavy rainfall viral pic | त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा

त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा

Next

कोरोनाकाळात  संपूर्ण जगभरातील लोकांना कधीही न अनुभवलेल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. कोरोनाची माहामारी आणि लॉकडाऊनच्या काळात अनेकांना माणूसकीचा अर्थ पुन्हा नव्याने उमगला.  लॉकडाऊनमध्ये सगळेजण आपालल्या घरी असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र रात्रंदिवस झटत होते. गोरगरीबांसाठी अन्नादाता तर अनेकांसाठी खाकी वर्दीतील कर्मचारी देवदूत ठरले. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.

भर पावसाच्या पाण्यात एक रिक्षा अडकलेली असताना पोलिसाने या माणसाची मदत केली आहे. पाण्याचे प्रमाण वाढल्याने या रिक्षाचा तोल जात होता. त्याचवेळी पोलिसाने या रिक्षावाल्याला मदतीचा हात दिला आहे. तुम्हाला या फोटोमध्ये दिसून  येईल प्रचंड जोर लावून  खाकी वर्दीतील देवमाणूस रिक्षाला पडण्यापासून वाचवत आहे.  सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोतील पोलिसाने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. 

हा फोटो ट्विटरवर अनिज्ञा चट्टोपाध्याय  यांनी शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की काल भर पावसात एक पोलिस कॉन्स्टेबल रिक्षा चालकाच्या मदतीला धावला आहे. या फोटोला चार हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि  २०० पेक्षा जास्त रिट्विटस मिळाले आहेत.  लोकांनी या फोटोवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कोरोनाकाळातील पोलीसांचे कार्य उल्लेखनीय होते. सध्या या फोटोने लोकांची मनं जिंकून घेतली आहेत.

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण

Web Title: Delhi police constable was trying to help a auto driver after heavy rainfall viral pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.