कोरोना काळात लोक एकमेकांशी हात मिळवण्यासाठी तसंच गळाभेट घेण्यासाठी सुद्धा घाबरत आहेत. कोरोनाच्या भीतीने सगळ्यांच्याच जीवनशैलीवर परिणाम घडून आला आहे. सोशल मीडियावर एका डॉक्टरचा आणि पेशंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टरांनी वयोवृद्ध कोरोना रुग्णाला गळाभेट दिली आहे. जोसेफ वारेन नावाच्या या डॉक्टरांचा हा व्हायरल होणारा फोटो आहे. हे डॉक्टर अमेरिकेतील टेक्सासच्या एका रुग्णालयात कार्यरत आहेत. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
एबीसी वृत्तसंस्थेने याबाबत अधिक माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यांनी दिलेल्या माहितीनुसार हे डॉक्टर युनायटेड मेमोरिअल मेडिकल सेंटर ह्यूस्टनमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टरांनी ज्या आजोबांना गळाभेट दिली आहे. ते आजोबा कोरोनाबाधित असून या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
डॉ. जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आजोबा आयसीयूमध्ये खूप दुखावस्थेत होते. इतकंच नाही तर हे आजोबा कोणालाच ओळखत नव्हते. मला बघताच क्षणी हे आजोबा भावूक झाल्यामुळे त्यांना रडू कोसळलं. म्हणून मी त्यांना गळाभेट दिली. डॉ. जोसेफ यांनी सांगितले की, ''कोरोनाकाळात १६-१६ तास नोकरी करावी लागत आहे. अनेकदा आम्हाला सुरक्षित घरी परत जाऊ की याचीसुद्धा खात्री नसते.''