काही निर्भिड असतात तर काही लोकांना परिस्थिती निर्भिड बनवते आणि काही लोक आपोआप बनतात. असे लोक जन्मच निर्भिडपणे घेतात. बालपणी अनेकांना कुत्र्यांची सर्वात जास्त भिती वाटत असते. कुत्री अशी मागे लागतात की, पॅंट धरून पळावंच लागतं. अनेकदा तर कुत्रा चावतो सुद्धा. पण एका लहान मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओतून एक संदेशही मिळतो आणि हा मुलगा काय करतो हे बघून तुम्ही त्याचं कौतुकही कराल.
आयएफएस अधिकारी प्रवीण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दोन लहान मुले दिसत आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आहे. दोनपैकी एक मुलगा कुत्री मागे लागताच तेथून पसार होतं. पण दुसरा मुलगा तिथेच अडकतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुत्री त्यालाही घाबरत आहेत तर तोही तिथे थांबून हिंमतीने कुत्र्यांना तेथून पळवून लावतो.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओला आतापर्यंत ४३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.