बाबो! नवीन वर्षाच्या रात्री त्याने इतकी ढोसली की टायर नसलेली कार पळवत सुटला आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 01:11 PM2020-01-03T13:11:05+5:302020-01-03T13:11:45+5:30

नशेत गाडी चालवणं हा गुन्हा आहे. पण तरी सुद्धा काही लोक अति आत्मविश्वासाने नशेत गाडी चालवतात.

Drunk driver six times over the limit caught driving with no front tyres in greater manchester | बाबो! नवीन वर्षाच्या रात्री त्याने इतकी ढोसली की टायर नसलेली कार पळवत सुटला आणि.....

बाबो! नवीन वर्षाच्या रात्री त्याने इतकी ढोसली की टायर नसलेली कार पळवत सुटला आणि.....

googlenewsNext

नशेत गाडी चालवणं हा गुन्हा आहे. पण तरी सुद्धा काही लोक अति आत्मविश्वासाने नशेत गाडी चालवतात. पण एका व्यक्तीने दारू पिऊन काहीच्या काही कारनामा केलाय. ग्रेटर मॅन्चेस्टरमधील ही घटना असून येथील एका व्यक्तीने टल्ली होईपर्यंत दारू प्यायली होती. इतकी की, त्याला अजिबात अंदाज आला नाही की, तो टायर नसलेली कार चालवतो.

सुदैवाने ही व्यक्ती कार घेऊन जात असताना पोलिसांना आढळली. तेव्हा त्यांनी त्याला थांबवले. पोलिसांनी त्याने किती अल्कोहोल सेवन केलं चेक केलं. त्यात त्याने सहा पट अधिक दारू प्यायल्याचं समोर आलं. 

GMP Traffic पोलिसांनी या घटनेची माहिती सोशल मीडियातून दिली. कारचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ही व्यक्ती विना टायरचीच कार चालवत होती. त्यामुळे आम्ही त्याला थांबवलं. त्याची टेस्ट घेतली तेव्हा अल्कोहोल लेव्हल ६ पटीने अधिक होतं.

यावर नंतर लोकांनी अनेक कमेंट केल्या तर अनेकांना सल्ले दिले. पण पोलिसांनी वेळीच त्याला थांबवल्याने मोठा अपघात टळला. पोलिसांनी त्याला नवीन वर्षाच्या रात्री दीड वाजता अटक केली होती.


Web Title: Drunk driver six times over the limit caught driving with no front tyres in greater manchester

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.