अडीच हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी; अन् उघडल्यावर दिसलं 'असं' काही, पाहा व्हिडीओ
By manali.bagul | Published: October 6, 2020 02:05 PM2020-10-06T14:05:43+5:302020-10-06T15:02:03+5:30
Viral video Marathi : इजिप्तमधील मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी प्राचीन ममीची पेटी(Ancient Mummy Coffin) उघडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
जेव्हाही प्राचीन इजिप्तबद्दल बोललं जातं तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड. इथे उत्खननात नेहमीच प्राचीन ममी मिळतात. आज आम्ही तुम्हाला या ममीचा एक व्हिडीयो दाखवणार आहोत. इजिप्तमधील मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी प्राचीन ममीची पेटी(Ancient Mummy Coffin) उघडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार या वर्षाच्या सुरूवातील ५६ बंद पेट्या सापडल्या होत्या. त्यातील १२ पेक्षा जास्त पेट्या या साककारा मध्ये उघडण्यात आल्या होत्या. साककारा मिस्त्र येथिल विशाल, प्राचीन दफन मैदान आहे.
The mummy tomb, which has been sealed for 2500 years, has been opened for the first time. pic.twitter.com/KWGT95girv
— Psychedelic Art (@VisuallySt) October 5, 2020
मिस्त्र पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार साककाराच्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरांमध्ये ५९ लाकड्याचा पेट्यांचा शोध घेण्यात आला होता. लाकडाच्या पेट्या चांगल्या स्थितीत होत्या. या पेट्यांमध्ये प्रतिष्ठीत आणि वरिष्ठ लोकांच्या मृतदेहांचा समावेश होता. शनिवारी एक पेटी (Ancient Mummy Coffin) पहिल्यांदा उघड्यात आली. जवळपास २ हजार ५०० वर्षांपूर्वी ही पेटीबंद करण्यात आली होती. पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाकडून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत एक ममी होती. एका दफन कापडात गुंडाळून ठेवण्यात आला होती. Video: बापरे! नशेच्या धुंदीत महिला वॉशिंग मशिनमध्ये अडकली, बाहेर निघता निघेना, अन् मग....
हा व्हिडीओ ट्विटरवर ५ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 72 हजारांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक लोकांनी हजारो वर्षांपूर्वीची पेटी उघडणं म्हणजे २०२० मधील सगळ्यात चांगली कारवाई असल्याचे म्हटले आहे. नॅशनल ज्योग्राफिकच्या रिपोर्टनुसार पॉप संस्कृती आणि लोककथांमध्ये ममीची पेटी उघडल्यानंतर मृत्यू किंवा अभिशाप होतो असं मानलं जातं. न्युजिलँडचे राजदूत ग्रेग लुईस यांनी ट्विटरवर शनिवारी हा व्हिडीओ शेअर केला होता. Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ