परीक्षा हॉलमध्ये शिरल्या शिरल्या जणू केलेला सर्व अभ्यास विसरल्यासारखं होतं. त्यामुळे अनेकजण पेपर सुरू होण्याआधीपर्यंत अभ्यास करत राहतात. म्हणजे अभ्यासासाठी त्यांना वेळ कमी पडतो. अशाच एका अभ्यासू मुलाचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याने अभ्यास करण्याची एक वेगळीच आयडिया काढलीये. हा व्हिडीओ आहे चीनमधील.
या व्हिडीओत एका मुलगा परीक्षा सुरू होण्याआधी पुस्तकातील ज्ञान डोक्यात भरताना दिसत आहे. पण त्यासाठी त्याने वापरलेली स्टाइल मात्र सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे. अनेकांना हा क्यूट मुलगा आणि त्याची क्यूट स्टाइल लोकांना फारच आवडली.
हा व्हिडीओ आयएएस अवनीश शरण यांनी शेअर केलाय. तसेच त्यांनी कॅप्शन दिलंय की, 'परीक्षेच्या दिवसातील फायनल राउंडची तयारी. कुणी कुणी अशी तयारी केलीये?'. हा व्हिडीओ सोशल मीडियात फारच व्हायरल झालाय. आतापर्यंत या व्हिडीओला 38 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 2.7 पेक्षा जास्त लाइस्क मिळाले आहेत.
हा व्हिडीओ चीनच्या गुइझोउ स्कूलमधील एका टीचरने हा व्हिडीओ शूट केला होता. टीचरना जेव्हा याबाबत विचारले तर समोर आलं की, सगळे विद्यार्थी डिक्टेशनची तयारी करत होते. तेव्हाच हा मुलगा पुस्तक वाचण्याऐवजी, परीक्षेआधी अशा वेगळ्या प्रकारे अभ्यास करताना दिसला.
Viral Video : 'अशी' खतरनाक असते भौ बिबट्याची स्टाईल, व्हिडीओ एकदा बघाल बघतच रहाल....
इंग्लिश स्पीकिंग क्लासची 'ही' जाहिरात पाहून जमिनीवर लोळून लोळून हसाल!