पोत्याचं कव्हर त्यावर हिरवंगार गवत, गर्मीपासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाचा नवा प्रयोग; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:52 PM2024-04-26T15:52:48+5:302024-04-26T15:57:59+5:30
सध्या सोशल मीडियावर एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Social Viral : संपूर्ण देशभरात मागील काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होताना दिसतेय. पण कामाच्या ठिकाणी जाताना प्रत्येकाची अवस्था अगदी खुपच वाईट होऊन जाते. काही जण तर अशक्षरश: घामाच्या धारेने न्हाऊन निघतात. शहरी भागात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांची बस, लोकलमधील गारेगार प्रवासाला सर्वाधिक पसंती देतात. पण सर्वसामान्य नागरिकांची मोठी फरफट होते. हा महागडा प्रवास त्यांना परवडणारा नसतो. त्यासाठी एका रिक्षा चालकाने अनोखा जुगाड केलाय. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. व्हिडिओमध्ये एका रिक्षा चालकाने चक्क गर्मीपासून सूटका मिळवण्यासाठी आपल्या ऑटोच्या वरील भागाला पोत्यांचं कव्हर लावलंय. इतकंच नाही तर त्यावर गवत उगवल्याचं पाहायला मिळतंय. पोत्यावरील गवतामुळे रिक्षाच्या वरील भाग कायम थंड राहिल आणि प्रवासी भाडेकरूला गर्मीचा त्रास होणार नाही. या इंको फ्रेंडली कुलिंगमुळे रिक्षातील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार येवढं मात्र नक्की!
हा व्हिडिओ pooran-dumka नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. जवळपास ६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर ठंडा ठंडा कूल कूल अशी कमेंट केली आहे.तर आणखी एक जण म्हणतो, ''सात तोफो की सलामी भाई कों'' अशी कमेंट त्याने केली आहे.