आता शाळेतील किंवा कॉलेजमधील स्पर्धांमध्ये हार-जीत या गोष्टी तर होतच राहतात. हे मुलांना जरी समजलं नाही तरी पालकांना नक्कीच समजायला पाहिजे. पण नाही ना....! अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील एका वडिलाने भलताच कारनामा केला.
Barry Lee Jones असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या मुलाने स्कूलमध्ये रेसलिंगमध्ये भाग घेतला होता. पण त्याच्या मुलाला दुसऱ्या स्पर्धाने पराभूत केलं. आता ठिकेना...पण नाही barry त्या दुसऱ्या मुलावर येऊ पडला आणि त्याला मारहाण केली. तेही सर्व लोकांसमोर.
Barry चं हे वागणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात तर घेतलंच, सोबतच त्याला १ हजार डॉलरचा बेल बॉन्डही द्यावा लागला. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ७१ हजार रूपये इतकी होते. बघा म्हणून शाळेतील विजय-पराभव या गोष्टी जास्त मनावर घेऊ नये. उलट मुलांना पराभवातून उभं राहणं शिकवलं पाहिजे.