सोशल मीडियाच्या माध्यामातून आता कोणत्याही ठिकाणी काही घडल्यास ती माहिती वेगानं व्हायरल होत असते. अंगावर काटा येईल असा बॉम्बब्लास्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेरुसलेममध्ये (Jerusalem) पुन्हा हिंसाचार पेटला आहे. दर वेळेप्रमाणेच आपापल्या तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे हा वाद उफाळून आला आहे. इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
गाझा पट्टीच्या शहरातून गेल्या तीन दिवसांत 1500 हून अधिक रॉकेटचा मारा करणाऱ्या जहाल गट हमासविरोधात इस्त्रायलने (Israel attack) जोरदार वार केला आहे. प्रत्यूत्तरादाखल केलेल्या कारवाईत हमासला (Hamas) मोठा झटका बसला आहे. त्याचे 11 कमांडर मारले गेले आहेत. या रक्तरंजित संघर्षात पॅलेस्टाइनचे 70 लोक मारले गेल्याचे समजते आहे. तर इस्त्रायलने सांगितले की, आपले 6 लोक मारले गेले आहेत. या दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्येयुद्धास तोंड फुटू शकते असा इशारा दिला आहे.
तेथिल रहिवासी असेल्या एका व्यक्तीच्या घराबाहेर हा स्फोट झाला. ते पाहून लाईव्ह शोमधल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. माया हुसेनने इन्स्टाग्राम आयजीटीव्हीवर हा व्हिडिओ दोन भागांत शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिलं आहे, 'प्रत्येकाने जागे व्हा. गाझामध्ये हल्ले, स्फोट होत आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
20 ते 30 हजार रॉकेट...
इस्त्रायल सैन्याच्या अंदाजानुसार हमासकडे सध्या 20 ते 30 हजार रॉकेट आहेत. आता आम्ही हमासला कायमचे शांत करूनच थांबू, असे इस्त्रायलने ठरविले आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी या दोघांमध्ये पुन्हा युद्ध सुरु होण्याचा इशारा दिला आहे.
इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा काय आहे? -
शत्रू राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी ही यंत्रणा आहे तसंच राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे.
इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि छोटे रॉकेट्सर्स आयर्न डोम तंत्रज्ञानाच्या साह्याने हवेतल्या हवेतच नष्ट केली जातात. हवाई हल्ल्यांपासून आपल्या शहरांचे, नागरिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने इस्रायलने २०११ मध्ये आयर्न डोम यंत्रणेचा सुरक्षा दलांमध्ये समावेश केला. फक्त शहराच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांनाच नष्ट करण्यासाठी इस्रायल ही यंत्रणा वापरतो.