जीवनात सगळं काही सहज मिळालं आणि निवांत जगणं असेल तर कुणीही स्वत:ला हुशार समजतं. पण जीवनाचं खरं ज्ञान त्याला म्हणतात जेव्हा समोर वाईट परिस्थिती असेल. वाईट परिस्थितीसोबत लढणं हे मोठं हिंमतीचं काम असतं. त्यांपासून दूर पळणाऱ्यांना घाबरट म्हटलं जातं. एका आयपीएस ऑफिसरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा तुम्हाला सांगले की, वाईट परिस्थितीत तुम्ही कसे मनुष्य असाल.
त्यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, 'या परिस्थितीत नागरिक कसं रिअॅक्ट करतात. याने ठरतं की, देशाचा सामाजिक विकास होणार की पतन होणार. बघा आणि विचार करा. यांच्या जागी तुम्ही असते तर थांबून मदत केली असती? की पळाले असते?
या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, एका तरूणी रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या मुलीला उचलतो. तिला तो कारच्या डिग्गीत टाकण्याचा प्रयत्न करतो. हा एकप्रकारचा सोशल एक्सपरिमेंट व्हिडीओ आहे. आजूबाजूचे काही लोक ही घटना पाहून पळून जातात. तर काही लोक मुलीच्या मदतीसाठी थांबतात. आता तुम्हाला ठरवायचंय तुम्ही काय केलं असतं?
आतापर्यंत या व्हिडीओला २२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी लोकांना विचारले की, यावेळी तुम्ही काय केलं असतं? जास्तीत जास्त लोकांनी हेच सांगितलं की, त्यांनी तिची मदत केली असती.
एका यूजरने लिहिले की, हा व्हिडीओ मनोवैज्ञानिक दृष्टीने लोकांना जागरूक करण्यासाठी चांगला व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी केलेला प्रॅक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे.