रोज वापरुन मळलेले कॉड्स करा झटपट स्वच्छ, घरच्याघरीच करुन पाहा ही ट्रिक, कॉड्स दिसतील नव्यासारखे...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:12 PM2024-11-23T19:12:41+5:302024-11-23T20:17:12+5:30
How can I clean the inside of my EarPods : How to clean EarPods for better sound : Best Way to CLEAN EarPods & Fix Volume Issues : मळके - घाणेरडे कॉड्स स्वच्छ आणि पुन्हा पहिल्यासारखे नवे चकचकीत करण्यासाठीची नवी आयडिया...
मोबाईल, इंटरनेट प्रमाणेच हेडफोन्स किंवा कॉड्स आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे. मोबाईलवर गाणी ऐकणे, कॉलवर बोलणे यांसारख्या अनेक कामांसाठी आपण कॉड्सचा वापर करतो. काहीवेळा हातातील काम करता करता आपल्याला मोबाईलवर बोलायचे असते अशावेळी आपण मोबाईल हातात धरु शकत नाही, तेव्हा कॉड्स वापरणे फायदेशीर ठरते. सध्या बाजारांत वेगवेगळ्या प्रकारच्या कॉड्स अगदी सहज विकत मिळतात. यातील काही कॉड्स या वायरलेस असतात तर काही वायरद्वारे मोबाईला कनेक्ट कराव्या लागतात (Best Way to CLEAN EarPods & Fix Volume Issues).
अशा या कॉड्स आपण रोज वापरतो तसेच काहीवेळा तासंतास कानाला लावून बोलतो. याच्या अधिक वापराने कॉड्स खराब होतात किंवा त्या कॉडच्या छिद्रांमध्ये घाण, मळ साचून राहतो. काहीवेळा कानातील मळ, आजूबाजूच्या त्वेचेवरील घाम, अशा बऱ्याच गोष्टींच्या संपर्कात येऊन ही कॉड्सची छिद्र खराब होतात. यामुळे त्या कॉडच्या छिद्रांमधून व्यवस्थित ऐकायलाही येत नाही तसेच असे मळके कॉड्स वापरणे देखील योग्य नाही. यासाठी आपण घरच्या घरी एक सोपी ट्रिक वापरुन असे मळके - घाणेरडे कॉड्स लगेच स्वच्छ आणि पुन्हा पहिल्यासारखे नवे चकचकीत करु शकतो. कॉड्स स्वच्छ करण्याची ही ट्रिक कोणती ते पाहूयात (How to clean EarPods for better sound).
कॉड्स स्वच्छ करण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रिक...
रोजच्या वापरातील खराब व मळके झालेले कॉड्स स्वच्छ करण्याची ट्रिक mommywithatwist या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. कॉड्स स्वच्छ करण्यासाठी आपल्याला व्हाईट व्हिनेगर, पाणी, टूथब्रश, टिश्यू पेपर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. रोज वापरुन खराब झालेली कॉड्सची छिद्र स्वच्छ करण्याची एक नवी भन्नाट ट्रिक.
खराब व मळके झालेले कॉड्स स्वच्छ करण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये व्हाईट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घ्यावे. आता हे व्हिनेगर, पाण्याचे मिश्रण हलवून एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर टूथब्रश घेऊन तो या द्रावणात बुडवून घ्यावा. टूथब्रशच्या मदतीने हे द्रावण कॉड्सच्या छिद्रांवर लावून हलकेच घासून घ्यावे. त्यानंतर टिश्यू पेपरच्या मदतीने हे कॉड्स स्वच्छ पुसून घाव्येत. कॉड्स स्वच्छ पुसून घेतल्यानंतर किमान दोन तास तरी हे कॉड्स संपूर्णपणे सुकण्यासाठी ठेवून द्यावे.
गाद्यांवर पडलेले डाग - घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल....
गाद्यांवर पडलेले डाग - घाणेरडा वास घालवण्यासाठी हे घ्या उपाय, फक्त ४ पदार्थ वापरा-प्रश्नच सुटेल....
अशाप्रकारे आपण खराब व मळकी झालेली कॉड्स फक्त मिनिटभरात झटपट स्वच्छ करु शकता.