ऑप्टिकल इल्यूजन असलेले कित्येक फोटो आपण सोशल मीडियावर नेहमीच बघत असतो. काही फोटो तर इतके आश्चर्यजनक असतात की, विश्वासही बसत नाही. ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोंमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. म्हणजे जे आहे ते दिसत नाही आणि जे नाही ते दिसतं.
असाच एक जुना फोटो सोशल मीडियात पुन्हा व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये काही घोडे दाखवण्यात आले आहेत. मात्र, घोड्यांचा आणि त्यागील रंग हा एकसारखा असल्याने त्यात किती घोडे एकत्र उभे आहेत हे सहज लक्षात येत नाही. अनेकजण हा फोटो पाहून आणि त्यातील घोडे मोजून थकले आहेत. आता तुम्ही बघा आणि सांगा यात किती घोडे आहेत.
ज्यांना यातील घोड्यांची संख्या योग्य सांगता येईल ते आनंदाने नाचू शकतात. तसेच त्यांचे डोळे किती चांगले आहेत हेही त्यांना कळेल. पण ज्यांना काहीच कळत नाहीये त्यांच्यासाठी खाली उत्तर देत आहेत.
वरील फोटोमध्ये एकूण पाच घोडे आहेत. पण ते एकत्र उभे असल्याने सहज लक्षात येत नाही.