Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:49 PM2021-04-02T17:49:08+5:302021-04-02T18:08:27+5:30

Idli amma will get own house : महिंद्रा समूहानं त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे. महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार आहे. 

Idli amma from tamil nadu will soon have its own house anand mahindra gave this reaction | Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

Next

आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमुळे अनेकांचे मन जिंकलं आहे.  महिंद्रा सुमहाचे अध्यक्ष (Chairman of Mahindra Group) यांनी खुलासा केला आहे की, तमिलनाडुच्या (Tamil Nadu) प्रसिद्ध "इडली अम्मा" (Idli Amma)  ज्या दोन वर्षांपूर्वी एक रूपयात इडली बनवून विकत होत्या, त्यांची कहाणी खूप व्हायरल झाली होती. आता या आजींकडे स्वतःचं घर असणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कमलाथल बद्दल ट्विट केले होते की, ज्या "इडली अम्मा" म्हणून ओळखल्या जातात. त्या कमलाथलची कहाणी बाहेर आल्यानंतर ती देशभर व्हायरल झाली. या आजी इडलीसह सांबर आणि चटणी लोकांना प्रति १  रूपयात खायला घालतात.''

आनंद महिंद्रा यांनी  २०१९ मध्ये एक ट्विट केले होते,  ज्यात त्यांनी इडली अम्माला एलपीजी कनेक्शन देण्याविषयी सांगितले होते. उद्योजकांच्या या ट्विटने आजीचे लक्ष वेधून घेतले आणि भारत गॅस कोयंबटूरने त्यांना एलपीजी कनेक्शन जोडून दिले. 

 आनंद महिंद्रांनी ट्विट करत 'हे आश्चर्यकारक आहे. भारत गॅस कोयंबटूर यांनी कमलाथल यांना गॅस भेट दिल्याबद्दल धन्यवाद. जसे मी आधीच सांगितले आहे की, एलपीजी वापरण्याच्या त्याच्या सततच्या खर्चाचे समर्थन केल्याबद्दल मला आनंद झाला. " असं त्यांनी म्हटलं होतं.

आज सकाळीच आनंद महिंद्रांनी ट्विट केलं आहे. महिंद्रा समुहानं कमलाथल यांच्या व्यवसायात गुंतवणूक करणं सगळ्यात उत्तम ठरलं.  प्राथमिकता घर किंवा कार्यक्षेत्र आहे. ज्या ठिकाणी त्या जेवण बनवू शकतात आणि इडली विकू शकतात. याची जाणीव झाली त्यानंतर महिंद्रा समूहानं त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे. महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू करणार आहे. कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, "जलद गतीने जमीन नोंदवून आमचा १ मैलाचा दगड गाठण्यात मदत केल्याबद्दल थोंडमुथुर येथील नोंदणी कार्यालयाचे आभार." कमलाथल यांना एलपीजीचा पुरवठा केल्याबद्दलही त्यांनी भारत गॅस कोयंबटूरचे आभार मानले. काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

Web Title: Idli amma from tamil nadu will soon have its own house anand mahindra gave this reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.