सध्या सोशल मीडियात एका ११ वर्षीय अॅथलीट मुलीचा फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. चर्चा होत आहे तिच्या शूजची. आता तुम्ही म्हणाल की, शूजची चर्चा व्हायला असं त्यात काय आहे? तर हे शूज आहे होममेड. म्हणजे या मुलीने ब्राउन प्लास्टर बॅंडेज पायांना गुंडाळलं आणि त्यावर Nike चं साइन काढलं. एका स्पर्धेत धावण्यासाठी ती अशीच गेली होती. हा फोटो आता लोकांना भावूक करून गेलाय. आता लोक या मुलीला Nike कंपनीने ओरिजिनल शूज द्यावे अशी मागणी करत आहेत.
Predirick B. Valenzuela नावाच्या यूजरने फेसबुकवर या मुलीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, 'स्पाइक शूजचा नवीन डिझाइन. तेही मेड इन फिलिपीन्स. बालासनची राहणारी RHEA BULLOS ने रनिंगमध्ये तीन गोल्ड मेडल जिंकले आहेत. पण शूज घेऊ शकेल इतके पैसे तिच्याकडे नाही. त्यामुळे लोक भावूक झाले आहेत. ही पोस्ट २ हजार लोकांनी लाइक केली असून ८०० पेक्षा अधिक लोकांनी शेअर केली आहे. RHEA BULLOS ने ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर शर्यतीत गोल्ड मेडल जिंकले आहेत.
हा फोटो जेव्हा Alaska Aces प्रोफेशनल बास्केटबॉल टीमचे हेड कोच आणि Titan २२ बास्केटबॉल स्पेशलिस्ट स्टोरचे सीईओ Jeff Cariaso यांनी पाहिला तेव्हा त्यांनी या मुलीची मदत करण्याचा निर्णय घेतला. हा फोटो Iloilo स्कूल काउन्सिल मीट दरम्यान काढण्यात आलाय.