न्यूझीलंडची आतापर्यंतची सर्वात तरुण खासदार हाना रहिती माइपे-क्लार्क चर्चेत आल्या आहेत. संसदेत त्यांनी कांतारा स्टाईलसारखाच तेथील स्थानिक माओरी संस्कृतीचा हाका हा डान्स करत मुद्दा मांडला आहे. हाका हे एक युद्धगीत आहे जे पूर्ण ताकद आणि भाव-भावना प्रकट करत प्रस्तुत केले जाते.
त्या हे गीत गात नाचत असताना संसदेतील प्रेक्षक गॅलरी आणि इतर खासदारांनी देखील त्यांना साथ दिली. हाका गीत गात असताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्या काहीतरी गंभीर मुद्दा मांडत होत्या याची जाणीव होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव घाबरविणारे आहेत. जगभरातील खासदारांमधील हे पहिलेच अशाप्रकारचे भाषण आहे.
हा व्हिडिओ त्यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या भाषणाचा भाग आहे जो आता व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ काही तासांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. यावर लोक खूप छान कमेंटही करत आहेत.
'हाका' नृत्य येणाऱ्या जमातींचे स्वागत करण्याचा एक पारंपारिक प्रकार आहे. परंतु, ते लढाईत जाताना योद्धांना प्रोत्साहित करण्यासाठी देखील केले जायचे. शारीरिक शक्तीचे प्रदर्शनच नाही तर सांस्कृतिक अभिमान, सामर्थ्य आणि एकतेचे प्रतीक देखील आहे.