(Image Credit : freepik.com)
दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (13 जानेवारी), संक्रांती (14 जानेवारी) व किंक्रांती (15 जानेवारी) अशी नावे आहेत. हा सण दरवर्षी साजरा केला जात असला तरी अनेकांना या सणाचं महत्त्वंच माहीत नसतं. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला 'मकर संक्रांत' असं का म्हणतात.
(Image Credit : timesofindia.indiatimes.com)
संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. चला तर मग या मकरसंक्रांतीला आपल्या जवळच्या लोकांना मेसेज, शुभेच्छा देऊन हा सण साजरा करा.
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
(Image Credit : jagran.com)
कणभर तीळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा आपुलकी वाढवातिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
नाते अपुलेहळुवार जपायचे…तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबतअधिकाधिक दॄढ करायचे…मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
गगनात उंच उडता पतंगसंथ हवेची त्याला साथमैत्रीचा हा नाजूक बंधनाते अपुले राहो अखंडमकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाचीकणभर तीळ, मनभर प्रेमगुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवातिळगुळ घ्या गोडगोड बोला!
(Image Credit : bhaskar.com)
तुम्हांला व तुमच्या परिवारालानवचैतन्य, सुख, शांती, प्रेमघेऊन येवो हीच आमची कामनामकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हलव्याचे दागिने, काळी साडी…अखंड राहो तुमची जोडीहीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
(Image Credit : ghpmumbai.com)
एक तिळ रुसला , फुगलारडत रडत गुळाच्या पाकात पडलाखटकन हसला हातावर येताच बोलू लागलातिळगुळ घ्या गोड गोड बोला .
घालशील जेव्हां तू Designer साडीलाभेल तुला तिळगुळची गोडीमाझ्या हातात दे पंतगाची दोरीतुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांती!
(Image Credit : livehindustan.com)
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
साजरे करु मकर संक्रमणकरुण संकटावर मातहास्याचे हलवे फुटुनतिळगुळांची करु खैरात…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!