Video : कपलने अ‍ॅम्बूलन्सने लग्न मंडपात घेतली एन्ट्री, पण पडलं महागात....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:45 AM2020-01-03T11:45:02+5:302020-01-03T11:45:11+5:30

लग्न यादगार करण्यासाठी अनेक लोक एकापेक्षा एक वेगळ्या आयडिया लावतात. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की, एका नवरदेव लग्नात स्काय डायविंग करत पोहोचला होता.

Malaysian couple face criticism after they arrive in ambulance for wedding | Video : कपलने अ‍ॅम्बूलन्सने लग्न मंडपात घेतली एन्ट्री, पण पडलं महागात....

Video : कपलने अ‍ॅम्बूलन्सने लग्न मंडपात घेतली एन्ट्री, पण पडलं महागात....

Next

लग्न यादगार करण्यासाठी अनेक लोक एकापेक्षा एक वेगळ्या आयडिया लावतात. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की, एका नवरदेव लग्नात स्काय डायविंग करत पोहोचला होता. हेलिकॉप्टरमधून नवरदेव ही बाबही आता जुनी झाली आहे. असंच काहीसं नवीन करण्यासाठी मलेशियातील एका कपलने थेट अ‍ॅम्बूलन्समधून एन्ट्री घेतली. या कपलवर आता टिका होत आहे. नवरदेवाने नवरीला स्ट्रेचरवर बसवून मंडपात घेऊन गेला. 

डॉक्टरच्या कपड्यात नवरदेव

या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात नवरदेव डॉक्टरच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. नवरीच्या हातात एक गुलदस्ता आहे. नवरी-नवरदेवासोबत काही लोकही हॉस्पिटलच्या कॉस्च्युममध्ये दिसत आहेत.

व्हिडीओत कपलसोबत त्यांचे काही नातेवाईकही अ‍ॅम्बूलन्सने लग्न समारंभात पोहोचताना दिसत आहेत. पण सोशल मीडियातील लोकांनी यावर टिका केली. लोकांचं मत आहे की, स्ट्रेचर आणि अ‍ॅम्बूलन्सचा वापर मनोरंजनासाठी करणं योग्य नाही. एखाद्या इमरजन्सी वाहनाचा असा वापरही चुकीचा असल्याचं लोक म्हणताहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक प्रशासकीय विभागाकडून या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले. ही घटना मलेशियातील क्वांतान येथील आहे. द स्टारच्या रिपोर्टनुसार, मंत्रालयाने याबाबत एक स्पष्टीकरण जाहीर केलं. त्यात ते म्हणाले की, लग्नात ज्या वाहनांचा वापर झाला ती वाहने प्रायव्हेट होती. ती त्यांनी भाड्याने आणली होती. तसेच नवरदेव हा मेडिकल ऑफिसर आहे. त्याने लग्न वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी असं केलं.


Web Title: Malaysian couple face criticism after they arrive in ambulance for wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.