पोलिसांपासून सुटका करण्यासाठी काहीही करण्याची आरोपींची तयारी असते. तरीही पोलिस आपल्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा योग्य वापर करत आरोपीपर्यंत पोहोचतात. सोशल मीडियावर पोलिसांचा आणि एका आरोपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पाठलाग सुरू असतानाच पोलिसांना चकवा देण्यासाठी हा आरोपी अचानक झाडावर जाऊन बसतो.
'कानून के हात लंबे होते है' असं तुम्ही ऐकलं असेलच याचाचा प्रयत्य तुम्हाला हा व्हिडीओ पाहताना येईल. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे. याबाबत अजूनही काही माहिती समोर आलेली नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, #Khakhi वाले आरामशीर खाली उतरवतील. या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी तुफान पंसती दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर शेअर केला जात आहे. आतापर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ६०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
१० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडावर चढून आरोपीला पकडण्यासाठी पोलिस कर्मचारी बुट काढतात. त्यानंतर आरामात झाडावर चढतात. मग हा व्हिडीओ संपतो. पोलिस कर्मचारी या आरोपीला पकडण्यात यशस्वी होतात की नाही यााबाबत माहिती समोर आलेली नाही. म्हणून लोकांकडून या व्हिडीओचा दुसरा पार्ट लवकरच दाखवा अशी मागणी करण्यात येत आहे.