मगरीचं रुप पाहिलं की, भलेभले थरथर कापतात, अशातच जर तुमच्यासमोर मगर आली तर तुम्ही काय कराल? ते दृश्य पाहून तुमच्या तोंडातून आवाजही निघणं बंद होईल. मगरीचा अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या एक मगर शाळेत घुसल्याचं पाहायला मिळत आहे. मगरीला पाहून विद्यार्थीही जोरजोरात ओरडून मदतीची याचना करु लागले.
मात्र त्याठिकाणी एका धाडसी युवकाने जी हिंमत केली ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, या युवकाने मगरीच्या शेपटीला पकडून फरफडत शाळेच्या बाहेर घेऊन गेला. हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरेडा येथील आहे. ज्याठिकाणी एका शाळेत लहान मगर घुसते, हा व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांनी पसंत केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक युवक मगरीला फरफडत शाळेच्या बाहेर घेऊन जातो. त्याने मगरीच्या शेपटीला पकडलं आहे. कशाचीही पर्वा न करता, न घाबरता युवक मगरीला घेऊन जात आहे, हे दृश्य पाहून विद्यार्थी जोरजोरात ओरडत आहेत.
या व्हिडीओत लहान मुलांचा आवाज स्पष्टपणे ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर टोरी नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करत त्याने म्हटलं आहे की, जर कोणी विचारलं असतं फ्लोरेडामध्ये काय चाललंय तर त्याला हा व्हिडीओ दाखवला असता. जिथे एक युवक मगरीला शाळेच्या बाहेर फरफडत नेत आहे. फ्लोरेडामध्ये मगरीचं येणं सर्वसामान्य आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील ज्यात कोणी मगरीच्या घराबाहेर बसलेलं दिसतं तर कोणी घराच्या स्वीमिंग पूलमध्ये पोहताना दिसतं.
७ सेकंदाच्या या व्हिडीओ तुम्हाला युवक मगरीचा फरफडत नेताना दिसत आहे, तो या मगरीला विद्यार्थ्यापासून दूर घेऊन जात आहे. निरखून पाहिलं तर मगरीचे डोळे आणि शेपूट एका टेपने बांधलेले दिसत आहे. व्हिडीओत शाळेतील लहान मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकायला मिळेल. हा व्हिडीओ आतापर्यंत २५ लाख लोकांनी पाहिला असून जवळपास २५ हजाराहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तर ३० हजार लोकांनी व्हिडीओ रिट्विट केला आहे. प्रत्येक युजर्स या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
फळं विकणाऱ्या गरीब विक्रेत्याकडून पोलिसांनी माल हिसकावला अन् पैसेही घेतले; व्हिडीओ व्हायरल
नियंत्रण सुटलेला जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येणार, तितक्यात वेगवान बोलेरो कार आली अन्...
एक ‘असा’ बैल तयार, ज्याची पुढील सर्व पिढी नर म्हणून जन्माला येणार; वैज्ञानिकांचा दावा
७० वर्षीय कोरोना रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू; सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड