पोलिसांनाच लावला चुना! रेस्टॉरंटमध्ये डोसा खायला गेलेल्या IPS अधिकाऱ्यांची झाली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 01:12 PM2023-05-10T13:12:57+5:302023-05-10T13:14:28+5:30

एका पोलीस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती दिली.

man duped policeman cheated ips officer who went to eat dosa in restaurant odisha viral news | पोलिसांनाच लावला चुना! रेस्टॉरंटमध्ये डोसा खायला गेलेल्या IPS अधिकाऱ्यांची झाली फसवणूक

पोलिसांनाच लावला चुना! रेस्टॉरंटमध्ये डोसा खायला गेलेल्या IPS अधिकाऱ्यांची झाली फसवणूक

googlenewsNext

पोलिसांचे काम समाजात न्याय आणि शासनव्यवस्था राबविणे आहे, पण ज्यांच्या खांद्यावर ही विशेष जबाबदारी आहे, त्याची कोणी फसवणूक केली किंवा कोणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय देण्याच काम त्यांच असतं.पण, सध्या पोलिसांचीच फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. खुद्द आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी ही माहिती दिली आहे. याविषयी ट्विट करत त्यांनी डोसा खाण्यासाठी गेलेल्या अरुण बोथरा यांची फसवणूक कशी केली आणि त्यांच्या नावावर जास्तीचे बिल चिकटवले.

अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई

अरुण बोथरा यांनी एका रेस्टॉरंटमध्ये डोसा ऑर्डर केला. त्याचे बिल मागितल्यावर त्यांना धक्काच बसला. एक डोसा मागवल्यावर त्यांना दोन डोस्यांचं बिल आलं. त्यांनी वेटरला याबाबत विचारले असता समोरच्या टेबलावरील व्यक्तीने पोलिसाचा मित्र असल्याचे भासवत डोसा मागवला आणि बिल न भरताच पळून गेल्याचे समोर आले.

बोथरा यांनी ट्विट करुन माहिती दिली. "मी एकटाच रेस्टॉरंटमध्ये डोसा खाण्यासाठी गेलो होतो. मला आश्चर्य वाटले, मी बिल पाहिले, त्यात दोन डोसांची किंमत लिहिलेली होती. वेटरला विचारल्यावर त्याने सांगितले की समोच्या टेबलसाठीही ऑर्डर होती. समोरचा व्यक्ती बिल येण्यापूर्वीच तो माणूस निघून."

अरुण यांच्या ट्विटला 3500 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 161 लोकांनी रिट्विट केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या फसवणुकीबद्दल अनेकांनी खंतही व्यक्त केली. एका व्यक्तीने गंमतीने कमेंट केली, "पुढच्या वेळी आम्हाला पण कॉल करा..." दुसर्‍या युजरने सांगितले की फुकटात डोसा खाणारी व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज तपासून पकडली जाऊ शकते. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, "मला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीला माहित आहे की तुम्ही पोलिस आहात?"

Web Title: man duped policeman cheated ips officer who went to eat dosa in restaurant odisha viral news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.