कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पण पत्नीसोबत रस्त्यावर डोसा विकण्यासाठी बनला आत्मनिर्भर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:22 PM2020-06-23T16:22:50+5:302020-06-23T16:39:00+5:30

कोरोनाच्या माहामारीमुळे नोकरी गेल्याने पोट भरण्यासाठी हे काम करायला हा शिक्षक प्रवृत्त  झाला आहे.

Man lost his teacher job due to covid19 pandemic now running a food cart with his wife | कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पण पत्नीसोबत रस्त्यावर डोसा विकण्यासाठी बनला आत्मनिर्भर!

कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पण पत्नीसोबत रस्त्यावर डोसा विकण्यासाठी बनला आत्मनिर्भर!

Next

कोरोनाच्या माहामारीमुळे लोकांचे आयुष्यंच बदलून गेले आहे. कधीही न ओढावलेल्या समस्यांचा सामना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना करावा लागला आहे. मागच्या काही दिवसात  माणसांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील.   दक्षिण भारतातील एका डबल एमए शिक्षकावर लॉकडाऊनमुळे डोसा विकण्याची वेळ आली आहे.  कोरोनाच्या माहामारीमुळे नोकरी गेल्याने पोट भरण्यासाठी हे काम करायला हा शिक्षक प्रवृत्त  झाला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात अशी स्थिती उद्भवत आहे. 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव रामबाबू मारागानी आहे.  हे गृहस्थ खम्मम शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक होते. पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने त्यांची नोकरी सुद्धा गेली. म्हणून त्यांच्यावर आपल्या पत्नीसोबत डोश्याची गाडी लावण्याची वेळ आली आहे. डोसा विकून ते आपले पोट भरत आहेत.

रामबाबू मारागानी  यांनी सांगितले की, ''मला कोणावरही अवलंबून राहायचे नाही. स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मला हे काम करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. माझी पत्नी मला या कामात मदत करत आहे.'' 

या जोडप्याच्या जिद्दीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. असं एका युजरने म्हटलं आहे. तर  जन्माला आलो आहे तर जगावं तर लागेल अशा कमेंट्स येत आहे. कठीण प्रसंगात निराश न होता जगण्याची उम्मेद ठेवून काहीतरी करत राहायला हवं. असा संदेश या जोडप्याच्या कहाणीतून मिळतो. 

काही दिवसांपूर्वी अशी एक पोस्ट सोशल  मीडियावर व्हायरल झाली होती. लॉकडाऊनमुळे दक्षिण भारतातील एका शिक्षकाची नोकरी गेल्यामुळे त्याने मजुरीच्या कामाला सुरूवात केली होती. बांधकामाच्या ठिकाणी मजूरीचे काम करत असताना या शिक्षकाला ७०० रुपये प्रती दिवस मिळत असतं. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी शिक्षकाची नोकरी गेल्यानंतर या माणसाने मजुरीचे काम स्विकारले होते. 

घरात आलेल्या पाहूण्यानं सर्वांची उडवली झोप; घ्यावी लागली रेस्क्यू टीमची मदत

...अन् डॉक्टर आमदाराने अनेक किमी पायपीट करुन सीमेवरील सुरक्षा जवानाचे प्राण वाचवले!

Web Title: Man lost his teacher job due to covid19 pandemic now running a food cart with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.