कमाल! हत्तीने सोंड अन् पायानं केली महिलेच्या पाठीची मालिश; पाहा अनोखा मसाज व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 03:20 PM2021-01-18T15:20:49+5:302021-01-18T15:28:57+5:30

Trending Viral News in Marathi : महिलेच्या शरीरावर किती दबाब टाकायचा हे हत्तीला बरोबर माहीत असून योग्य पद्धतीने हत्ती आपलं काम करत आहे.

Massage by elephant viral video on social media | कमाल! हत्तीने सोंड अन् पायानं केली महिलेच्या पाठीची मालिश; पाहा अनोखा मसाज व्हिडीओ

कमाल! हत्तीने सोंड अन् पायानं केली महिलेच्या पाठीची मालिश; पाहा अनोखा मसाज व्हिडीओ

Next

तुम्ही कधी हत्तीला माणसांची मसाज करताना पाहिलंय का? एवढा मोठा प्राणी एखाद्या माणसावर आपला पाय ठेवेल तेव्हा काय होईल, याचा विचारही केला जाऊ शकतं नाही. सोशल मीडियावर मालिशच्या प्रकारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एक हत्ती आपल्या सोंडेने महिलेच्या पाठिची मालिश करून देत आहे. विशेष म्हणजे महिलेच्या शरीरावर किती दबाब टाकायचा हे हत्तीला बरोबर माहीत असून योग्य पद्धतीने हत्ती आपलं काम करत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीकडून केल्या जाणाऱ्या  या मसाजचा आनंद ही महिला पूरेपूर घेत आहे. @amir2371360 या ट्विटर युजरने  १६ जानेवारीला हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओतील महिला आरामशीर पोटावर झोपली असून हत्ती आपल्या सोंडेने मसाज करत आहे. त्यानंतर हत्तीने आपल्या पायाचाही वापर केला आहे. खरं की काय? ६५ वर्षांपासून या माणसानं एकदाही अंघोळ नाही केली; कारण वाचून व्हाल अवाक्

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या रिएक्शन्स दिल्या आहेत. ''हत्ती आपला नोकर नाही. त्यामुळे असे प्रकार त्यांच्याकडून करून घेऊ नका. त्यांना आपण मोकळं सोडायला हवं. हे काम करण्यासाठी हत्तीला कसं प्रशिक्षण दिलं असावं याची आम्हाला कल्पना नाही.'' अशाही कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.  हा व्हिडीओ ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ५०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

Web Title: Massage by elephant viral video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.