कोरोनाकाळात अनेक लोक समाजासाठी चांगली काम करताना दिसून येत आहेत. तर काहीजण माहामारीच्या स्थितीचा फायदा उचलून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाकाळात सगळ्यांप्रमाणेच रिक्षाचालकांनाही नुकसानाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थिती मध्यप्रदेशातील भोपाळच्या रिक्षावाल्यानं सगळ्यांसाठीच आदर्श घालून दिला आहे. सोशल मीडियावर लोकांनी या रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खूप लोाकांनी रिक्षाचालक जावेद यांना फरिश्ता असं म्हटलं आहे.
एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मी सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर पाहिलं की, रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे लोकांवर वाईट प्रसंग ओढावत आहेत. कसंबसं प्रयत्न करून लोकांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं जात आहे. म्हणून मी लोकांची मदत करण्याचा विचार केला. त्यासाठी मी माझ्या पत्नीचे दागिने विकले. ऑक्सिजनसाठी मी रिफिल सेंटरच्या बाहेर उभा राहतो. गेल्या १५ ते २० दिवसांपासून मी हे काम करत आहे. यादरम्यान ९ गंभीर स्थितीतील रुग्णांना मी रुग्णालयात पोहोचवलं आहे.'' वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता या रिक्षा चालकानं रिक्षाला रुग्णवाहिकेचं रुप दिलं आहे. या रिक्षात ऑक्सिजन सिंलेडर आहे. ऑक्सीमीटर, पीपीई कीटची व्यवस्था केली आहे. त्यांनी सांगितलं की, ''माझा संपर्क क्रमांक सोशल मीडियावर देण्यात आला आहे. जर एखाद्याला रुग्णवाहिला मिळाली नाही तर ते मला फोन करू शकतात.'' नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं