Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण काही नवं नाही. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीतून वाट काढत प्रत्येकजण आपल्या कामचं ठिकाण गाठतो. मुंबईची जीवनवाहिनी लोकलचं हे एवढंच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण सध्या मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधल आहे.
याआधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधील डान्सचे किंवा थरारक दृश्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण अलीकडेच ट्रेनमधील वादक मंडळींच्या या व्हिडीओने लोकल प्रवाशांच्या भावनांच्या तारा छेडल्या आहेत. या बाजेवाल्यांनी दिवसभराच्या कामाच्या व्यापातून लोकल प्रवाशांची सूटका केली. थकल्या-भागल्या शरीराला यानिमित्ताने आराम देण्याचं काम त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये, काही बॅंजो वादक मंडळी त्यांची ऑर्डर वाजवून घरी जात असताना त्यांनी लोकल ट्रेनच्या प्रवासात चार चांद लावले. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये या बाजेवाल्यांनी वाजवायला सुरुवात केली. मग काय चक्क लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी ताशाच्या तालावर ठेका धरला. या वादकांच्या अप्रतिम वादनाने ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाच्या तोंडावर हसू खुलल्याचं दिसतंय. ताशाच्या आवाजात तल्लीन होत लोकल ट्रेनमधील प्रत्येक प्रवासी नाचताना दिसतोय.
पाहा व्हिडीओ-
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय. मुंबईकरांचा हा अनोखा अंदाज पाहून लोकांनी भरभरुन कौतुक केलं आहे.